मँचेस्टर। उद्या(16 जून) आयसीसी 2019 विश्वचषकात 22 वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात होणार आहे. या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या महत्त्वाच्या सामन्याआधी भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने भारतीय संघाला अतिआत्मविश्वास न बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
मास्टर ब्लास्टर सचिनने इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत भारताने विश्वचषकात 6-0 असे पाकिस्तान संघाविरुद्ध वर्चस्व राखले असले तरी 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला पराभव स्विकारावा लागला असल्याची आठवण करुन दिली आहे.
सचिन म्हणाला, ‘पाकिस्तानसाठी चॅम्पियन ट्रॉफी 2017 चांगले पुनरागमन होते. 6-0 अशा पिछाडीनंतर पाकिस्तानने शेवटचा विजय मिळवला आहे. भारतीय संघाला अतिआत्मविश्वास बाळगून चालणार नाही.’
6 विश्वचषक खेळलेला सचिन पुढे म्हणाला, ‘मी समजू शकतो की रवी शास्त्री, विराट कोहली आणि बाकी अन्य सर्व वरिष्ठ खेळाडूंना मैदानात जाऊन ज्यात आपण चांगले आहोत त्यावरच जास्त जोर द्यावा लागणार आहे.’
सचिन पुढे म्हणाला, ‘मला वाटते जेव्हा तूम्ही जिंकत असता तेव्हा तूम्ही वेगळा विचार करत असता. पण एक संघ म्हणून आपण अतिआत्मविश्वास न बाळगण्याचा विचार केला पाहिजे.’
‘तूम्ही तूमचा विश्वास तूमच्या किटबॅगमध्ये भरा आणि तो घेऊन प्रवास करा. ज्या संघाने सातत्याने विचार प्रक्रियेवर विजय मिळवला आहे, यात वेगळे आहे आणि तूम्हाला विश्वास हवा की तूम्ही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकता.’
‘सध्याच्या स्थितीत भारतीय संघ 100 टक्के चांगला संघ आहे. मागील काही महिन्यापासून आपण ज्याप्रकारे कामगिरी केली आहे, त्यानुसार आपण सध्या अव्वल आहोत. आपल्याला ही लय कायम ठेवायची आहे.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विराट कोहलीच्या फलंदाजीचे व्हिडिओ पाहून शिकतोय पाकिस्तानचा हा फलंदाज
–तूम्ही धोनीचे मोठे फॅन असाल तर इथे मिळेल मोफत जेवण!
–…म्हणून रवी शास्त्रींनी ड्रेसिंग रुमच्या बाल्कनीमधून दाखवली धोनीची जर्सी