सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गेलेला आहे. त्याठिकाणी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया सोबत २७ नोव्हेंबर पासून ३ वनडे सामने, ३ टी-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतेल. तो पहिल्या कसोटीनंतर पालकत्व रजा घेणार आहे. त्यामुळे बर्याच दिग्गजांनी विराटच्या अनुपस्थिती बाबत आपली मते मांडली. यामध्ये आता भारताचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही प्रतिक्रिया दिली आहे.
सचिन तेंडुलकरने म्हटले आहे की, विराट कोहलीची अनुपस्थित ही एक निश्चितचं मोठी बाब आहे, परंतु त्यामुळे बाकावर बसणार्या खेळाडूंना संधी असेल.
सचिन तेंडुलकर एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, विराट नसणे एक मोठी गोष्ट आहे. परंतु, दुसरीकडे, आपल्याकडे ज्या प्रकारची बाकावर बसलेल्या खेळाडूंमध्ये ताकद आणि प्रतिभा उपलब्ध आहे, त्यानुसार ती कोणासाठी तरी ही चांगली संधी असेल. सचिन तेंडुलकर यांनी पुढे सांगितले, बाकावर बसलेल्या खेळाडूंजवळ संघात स्थान निश्चित करण्याची एक संधी असणार आहे.
सचिन तेंडुलकरने पुजारा, रहाणेबद्दलही केले भाष्य
विराट कोहली सोबत चेतेश्वर पुजाराचे नाव घेताना सचिन म्हणाले, हे दोघे खुप कालावधीपर्यंत एकमेकांसोबत खेळले आहेत. अजिंक्य रहाणे सुद्धा आहे, मात्र तो विराट आणि पुजाराच्या तुलनेत सलग प्लेईंग इलेव्हनचा भाग नव्हता.
याव्यतिरिक्त कसोटीत सलामी फलंदाजाबद्दल बोलतांना सचिन म्हणाला की ‘मला माहित आहे, मयंक (अगरवाल) एक उत्कृष्ट सलामी खेळाडू आहे. कारण त्याने भरपूर धावा केल्यात आणि जर रोहित शर्मा फिट व उपलब्ध असेल, तर तो त्याठिकाणी असावा.
अन्य खेळाडू (पृथ्वी शा, केएल राहुल) मध्ये, हा संघ व्यवस्थापनाचा निर्णय राहील. कारण त्यांना माहित आहे सध्या कोण फॉर्ममध्ये आहे.’
उल्लेखनीय म्हणजे , विराट कोहली आपल्या पत्नीच्या पहिल्या बाळंतपणासाठी भारतात परतेल, आणि ऑस्ट्रेलियात फक्त एक कसोटी सामना खेळू शकेल. उरलेल्या तीन कसोटी सामन्यात भारताच्या फलंदाजीची मदार पुजारा, रहाणे या अनुभवी खेळाडूंच्या खांद्यावर असणार आहे. भारतीय संघासाठी रोहित शर्मा देखील पहिल्या २ कसोटी सामन्यांना उपलब्ध असणार नाही. अशामध्ये संघाच्या अडचणी अजून वाढतील. त्यामुळे युवा खेळाडू काय करतात हे पहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवसाच्या दिवशीच हॅट्रिक घेणारा जगातील एकमेव गोलंदाज
संपूर्ण वेळापत्रक: असा असेल टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा, पाहा कधी आणि कुठे होणार सामने
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतात होणार इंग्लंड विरुद्ध क्रिकेट मालिका; पाहा कधी होणार सामने
ट्रेंडिंग लेख –
अविस्मरणीय! भारतीय चाहते कधीही विसरू न शकणार नाहीत अशा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ३ खेळी
वनडे मालिकेत ‘या’ तिघांना बसावे लागू शकते बाकावर; गिलचाही समावेश
टीम इंडियाचं हे ‘त्रिकुट’ उडवू शकतं ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या सर्वाधिक दांड्या