---Advertisement---

हे फक्त सचिनच करू शकतो! त्या खास खेळाडूंसाठी केलं असं काही की होतंय कौतुक

On: रविवार, ऑक्टोबर 27, 2024 8:56 PM
Sachin Tendulkar Viral Video
---Advertisement---

माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या मैदानावर आपल्या कौशल्याने या खेळाच्या देवाचा दर्जा मिळवला. चाहत्यांच्या हृदयात राहणारा सचिन हा क्रिकेटच्या मैदानावरचा मास्टर ब्लास्टर तर आहेच. मात्र, सचिनचे औदार्य सोशल मीडियावरही अनेकदा पाहायला मिळते. सचिन खूप आलिशान जीवन जगतो, त्याला महागड्या गाड्यांचाही खूप शौक आहे. सचिन तेंडुलकरने रविवारी सकाळी त्याच्या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याला चाहत्यांची पसंती मिळतेय.

सचिन तेंडुलकरने रविवारी सकाळी त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये सचिन खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सचिन वाटेत थांबतो आणि गाडीतून खाली उतरतो. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासोबतच तो त्यांच्यासोबत फोटोही काढत आहे. सचिनच्या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.

काही काळापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. सचिनच्या या पोस्टवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, जेव्हा तुम्हाला रस्त्यावर अचानक देव दिसतो. तर एका चाहत्याने लिहिलंय की त्याचा आदर बघा. भाग्यवान लोक. कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणा बनल्याबद्दल सचिनचे आभार.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar)

सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खास प्रसंगी सक्रिय असतो. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झालेली नाही. उलट त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. सचिनचे देशभरात लाखो चाहते आहेत. त्याचवेळी, त्याची सोशल मीडिया फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे.

इंस्टाग्रामवर सचिन तेंडुलकरचे 49.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. जे अनेक क्रिकेटपटूंपेक्षा जास्त आहेत. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आपल्या वडिलांप्रमाणे क्रिकेटमध्ये आपले भविष्य घडवत आहे. तर त्याची मुलगी सारा तेंडुलकर मॉडेलिंगच्या जगात तिची कारकीर्द घडवतेय.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ 5 संघांकडून भारत घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा पराभूत!

“गौतम गंभीर लवकरच…” भारताच्या पराभवानंतर माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य!
रोहित शर्मानंतर कोण बनणार भारतीय कसोटी संघाचा कर्णधार? हे 3 खेळाडू शर्यतीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---