इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकात रविवारी(9 जून) भारताचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना द ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्याआधी भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध सावध राहण्याची इशारा दिला आहे.
इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार सचिन म्हणाला, ‘मागील सामन्यातून मिळवलेला आत्मविश्वास पाठिशी ठेवा आणि पुढचा सामना खेळा. ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना कठिण असणार आहे. कारण त्यांचा संघ संतुलित आणि आत्मविश्वास असलेला संघ आहे.’
सचिन द ओव्हल मैदानाबद्दल म्हणाला, ‘ओव्हलवर ऑस्ट्रेलिया चांगला खेळ करु शकतात. खेळपट्टी ही उसळणारी आहे आणि मला वाटते ऑस्ट्रेलियाला त्याची जास्त सवय आहे. त्यामुळे त्याचा ऑस्ट्रेलियाला फायदा मिळू शकतो.’
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या संघात डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथचे पुनरागमन झाले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या मागील दोन्ही सामन्यात चांगला खेळ केला आहे. वॉर्नरने अफगाणिस्तान विरुद्ध तर स्मिथने विंडीज विरुद्ध अर्धशतकी खेळी केली आहे.
त्यांच्याबद्दल बोलताना सचिन म्हणाला, ‘ते एक वेगळा संघ वाटत आहे.(स्मिथ आणि वॉर्नरच्या पुनरागमनानंतर) मी आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नरला पाहिले आहे. तो खूप फिट वाटत होता आणि त्यापेक्षा तो खूप समर्पित आणि मैदानात जाऊन धावा काढण्यासाठी प्रेरणा मिळालेला दिसत आहे.’
असे असले तरी भारतावर विश्वास दाखवताना सचिन म्हणाला, ‘पण मला वाटते भारतीय संघाकडे ज्याची गरज आहे ते करण्याची क्षमता आहे. ऑस्ट्रेलियाचे आक्रमण चांगले आहे पण भारतीय संघ ते आक्रमण खेळण्यास सज्ज आहे. आपण याआधी अशा आक्रमणाविरुद्ध चांगला खेळ केला आहे. त्यामुळे खेळाडूंनी त्यांच्या आक्रमणाचा सामना करण्यास सज्ज व्हावे.’
भारताने या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विश्वचषकातील हा भारताचा दुसरा तर ऑस्ट्रेलियाचा तिसरा सामना असणार आहे. ऑस्ट्रेलियाने त्यांचे पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–या कारणामुळे डिविलियर्सला विश्वचषकासाठी संधी दिली नाही, दक्षिण आफ्रिका बोर्डाने केला मोठा खूलासा
–विश्वचषक २०१९ : …तर ख्रिस गेल आउट झाला नसता!
–संपूर्ण वेळापत्रक: असा असेल टीम इंडियाचा जानेवारी २०२० मध्ये होणारा न्यूझीलंड दौरा






