दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 च्या सुरुवातीला सुरू झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजला अफाट लोकप्रियता मिळाली होती. मात्र, जगावर अचानक कोरोनाचे संकट आल्याने ही लीग मागील वर्षी पूर्ण करण्यात आलेली. या लीगच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद इंडिया लिजेंड्स संघाने मिळवले होते. आता या माजी खेळाडूंच्या लीगचा दुसरा हंगाम लवकरच सुरू होईल. या दुसऱ्या हंगामासाठी भारतीय संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर हाच करण्याची शक्यता आहे.
आयोजकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन पुन्हा एकदा इंडिया लिजेंड्स संघाचे नेतृत्व करेल. यावर्षी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे सामने लखनऊ, जोधपुर, कटक आणि हैदराबाद या शहरांमध्ये खेळले जातील. हंगामातील पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी लखनऊ शहरात खेळला जाणार आहे. तसेच अंतिम सामना 2 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये खेळला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊमध्ये एकूण 7 सामने खेळले जातील. कटक शहरात 6 सामने होतील आणि अंतिम सामन्यासाठी संघ हैदराबादला रवाना होणार असल्याचे सांगितल गेले आहे. लखनऊ आणि कटक शहरांमध्ये प्रत्येकी एक-एक डबल हेडर पार पाडतील. तसेच जोधपूरमध्ये २ डबल हेडर आयोजित केले गेले आहेत. उपांत्य सामने 29 आणि 30 सप्टेंबर रोजी होतील. नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या या लीगला सुरुवात झाली होती.
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या (Road Safety World Series) मागील वर्षीच्या हंगामात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नेतृत्वातील इंडिया लिजेंड्स संघाने अंतिम सामन्यात श्रीलंका लिजेंड्स संघाला मात दिली होती. अंतिम सामना भारताने 14 धावांच्या अंतराने जिंकला होता. विजयात युवराज सिंग आणि युसूफ पठाण यांनी महत्वाचे योगदान दिले होते. या दोघांनी देखील अर्धशतकी खेळी करत इंडिया लिजेंड्स संघाला विजय मिळवून दिला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हाँगकाँग विरुद्ध तळपला सूर्या! कॅप्टन रोहितला मागे टाकत केली ‘या’ मोठ्या विक्रमाची नोंद
शानदार.. जबरदस्त.. जिंदाबाद.. जडेजाचा कमाल थ्रो पाहून विराटही चकित; रिऍक्शन होती पाहण्यासारखी
श्रीलंका वि. बांगलादेश संघात ‘करा वा मरा’ची लढत, जिंकणारी टीम सुपर-4 मध्ये ‘या’ संघाशी भिडणार