कोविड-१९ महामारीनंतर क्रिकेटचे पुनरागमन झाले असून हळूहळू क्रिकेट क्षेत्र पुर्वपदावर येत आहे. अशात मागील वर्षी कोरोना महामारीमुळे अर्ध्यावर स्थगित करण्यात आलेली ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ २०२१ ही स्पर्धाही नुकतीच पुन्हा सुरू झाली. छत्तीसगडच्या रायपूर शहरात चालू असलेल्या या स्पर्धेतील सहभागी क्रिकेटपटूंचे मैदानावरील आणि मैदानाबाहेरील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसतात.
दरम्यान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा एक व्हिडिओ नुकताच चर्चेत आला आहे. या व्हिडिओत सचिन मोठमोठी फटकेबाजी किंवा गोलंदाजी करत नसून कोरोना चाचणी करुन घेताना दिसत आहे. यावेळी त्याने केलेले कृत्य आणि व्हिडिओवरील भन्नाट कॅप्शन सर्वांच्या आकर्षणाचा भाग ठरले आहेत.
त्याचे झाले असे की, इतर सामान्य कोरोना चाचणींप्रमाणे सचिनचीही चाचणी चालू होती. डॉक्टरांनी अतिशय हळूवारपणे आणि व्यवस्थित सचिनच्या नाकाचे सॅप्मल जमा केला. त्यानंतर अचानक सचिन मोठ्याने ओरडला. यामुळे डॉक्टर दचकले आणि सचिनला काही दुखापत झाली का? याची काळजी त्यांना वाटू लागली. तेवढ्यात सचिन हसू लागला आणि तो आपली मजा घेत असल्याचे डॉक्टरांना कळाले. नंतर डॉक्टरही मजेत हसू लागले. पुढे त्यांनी आनंदात चाचणी पूर्ण केली.
सचिनने आपल्या यूट्यूब अकाउंटवर हा गमतीशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘मला २०० टेस्ट (कसोटी सामने) आणि २७७ कोविड टेस्टचा (कोरोना चाचण्या) अनुभव आहे. कोरोना चाचणीवेळी सर्वांना हसवण्यासाठी थोडीसी मस्ती.’
इंडिया लीजेंड्स संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज २०२१ मध्ये सचिन इंडिया लीजेंड्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याच्याबरोबर विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग हेदेखील इंडिया लीजेंड्सचा भाग आहेत.
इंडिया लिजेंड्स या हंगामात आतापर्यंत ३ सामने जिंकत गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. रायपुर येथे झालेल्या सामन्यात इंडिया लींजेड्सने प्रतिस्पर्धी बांग्लादेश लीजेंड्सला १० विकेट्सचे पराभूत केले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेश संघाने १०९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल विरेंद्र सेहवागने ३५ चेंडूत नाबाद ८० धावांची तूफानी खेळी केली होती. तर सचिन तेंडूलकरने २६ चेंडूत नाबाद ३३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता.
तत्पुर्वी इंडिया लीजेंड्सने वेस्ट इंडिज आणि श्रीलंका लीजेंड्सला पराभूत केले होते. अशाप्रकारे आतापर्यंतचे ३ सामने जिंकत त्यांनी गुणतालिकेत अव्वलस्थानी ताबा मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मास्टर ब्लास्टरचं क्रिकेटप्रेम, दुखापत झाली तरीही सुई घेऊन मैदानात उतरणार; पाहा व्हिडिओ
वृद्धिमान साहाच्या मुलाचा बड्डे जल्लोषात साजरा, ‘विरुष्का’सह भारतीय खेळाडूंची उपस्थिती; फोटो व्हायरल
छोटा पॅक बडा धमाका! तुम्हाला पार्थिव पटेलबद्दलच्या ‘या’ खास गोष्टी माहितीये का?