---Advertisement---

“इंग्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांना घाबरले”, सचिन तेंडूलकरची यजमानांवर जहरी टीका

On: बुधवार, ऑगस्ट 18, 2021 1:38 AM
---Advertisement---

भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामना जिंकला. भारतीय संघाने हा सामना तब्बल १५१ धावांनी विजय मिळवत ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ज्यामुळे भारतीय संघाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मात्र, तिथेच दुसरीकडे इंग्लंड संघाला आता मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.

भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने देखील इंग्लंडच्या या खेळीवर टिप्पणी केली आहे. तेंडूलकरने इंग्लंडच्या खराब खेळीवर, तसेच त्यांच्या रणनीतीवर देखील आता प्रश्न उपस्थित केले आहेत. इंग्लंडचा संघ भारतीय गोलंदाजांना घाबरल्याचे देखील वक्तव्य तेंडूलकरने केले आहे.

तेंडूलकरच्या म्हणण्यानुसार इंग्लंडचा संघ सध्या भारताच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आक्रमणासमोर पुरता हैराण झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटसोडून इतर कोणताही इंग्लिश खेळाडू भारतीय गोलंदाजांसमोर मोठी खेळी करण्यात असमर्थ दिसत आहेत.

इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. यावर तेंडुलकरने आश्चर्य व्यक्त केले होते. तसेच त्यांच्यानुसार इंग्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांना घाबरल्याचे देखील जाणवून आले.

पीटीआय सोबत बोलताना तेंडूलकर म्हणाला, “इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयावर मी पुरता हैराण झालो होतो. यावरून आपण हे समजू शकतो की, इंग्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांबाबत अडचणीत आहेत. खरे सांगायचे झाले तर शुक्रवारी सकाळी साधारण ८ वाजताच्या आसपास मी माझ्या एका मित्राला सांगितले, जर वातावरण चांगले राहिले, तर हा सामना भारत जिंकू शकतो.”

इंग्लंडच्या फलंदाजांबाबत बोलताना तेंडूलकर म्हणाला, “जो रूटला सोडले तर इतर कोणत्याही इंग्लिश खेळाडूला भारताविरुद्ध शतकीय खेळी करताना पाहिले नाही. एखाद्या दुसऱ्या सामन्यात कोणी एखादा खेळाडू मोठी खेळी करू शकतो. मात्र, रूटसारखा नियमित खेळणारा फलंदाज मला इंग्लंडच्या ताफ्यात दिसत नाही. पूर्वी इंग्लंड संघात ऍलिस्टर कुक, मायकल वॉन, केविन पीटरसन, इयान बेल, जोनाथन ट्रॉट, अँड्रु स्ट्रॉस यांसारखे खेळाडू होते, जे नियमित चांगले प्रदर्शन करायचे.”

“माझ्या मते, कमजोर फलंदाजीमुळे रूटने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असावा.” असेही तेंडूलकर म्हणाला.

दरम्यान, २७२ धावांचे लक्ष्य मिळालेला इंग्लंड संघ जेव्हा फलंदाजीसाठी आला. तेव्हा इंग्लंडचा कोणताही फलंदाज भारतीय गोलंदाजी आक्रमणा समोर टिकू शकला नाही. ज्यामुळे इंग्लंडचा पूर्ण संघ केवळ १२० धावांवर गारद झाला आणि भारतीय संघाने हा सामना १५१ धावांनी जिंकत मालिकेमध्ये १-० ने आघाडी मिळवली.

महत्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकासाठी ‘हा’ दिग्गज खेळाडू असणार न्यूझीलंडचा गोलंदाजी प्रशिक्षक, मुंबई इंडियन्सची आहे खास नातं
खेळाडू आणि चाहत्यांनी एकत्र येत लॉर्ड्स कसोटी दरम्यान रूथ स्ट्रॉस फाऊंडेशनसाठी गोळा केला इतक्या कोटींचा निधी
टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची पहिलीच लढत पाकिस्तानविरुद्ध; अशी असेल स्पर्धेची रूपरेखा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---