---Advertisement---

‘पुन्हा स्वतःवर लक्ष केंद्रित कर’, सचिन तेंडुलकर यांनी पृथ्वी शॉला दिला महत्वाचा सल्ला स्वतः सांगितला खास प्रसंग

On: शुक्रवार, जून 27, 2025 3:00 PM
---Advertisement---

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ची क्रिकेट कारकिर्द सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. चांगला खेळाडू असलेल्या पृथ्वी शॉला सध्या स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी संधी मिळत नाही. तसेच आता त्याला मुंबईच्या संघांमधून वगळण्यात आलं आहे. तर आयपीएल 2025 च्या मेगा लिलावातही तो अनसोल्ड राहिला. त्याच्या कारकिर्दीत सर्व चढ-उतार असूनही, तो पुनरागमन करू शकतो असा विश्वास क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे दिग्गज सचिन तेंडुलकर यांनी (Sachin Tendulkar) त्याच्याबाबत दाखवला आहे.

गेल्या काही काळात क्रिकेटपासून त्याचं लक्ष विचलित झालं, ज्याचा त्याच्या खेळावर परिणाम झाला. सध्याच्या घडीला त्याला भारतीय संघ (Indian cricket team) तर दूरचं डोमेस्टिक क्रिकेट खेळायला पण मिळणं अवघड झालं आहे. दरम्यान सचिन तेंडुलकर यांनी त्याला पुन्हा पुनरागमन करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. पृथ्वी शॉ म्हणाला, त्याच्या वडिलांनंतर, सचिन तेंडुलकर हा त्याचा सर्वात मजबूत आधार आहे, तो म्हणाला की सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनशी अजूनही त्याचं तितकंच घट्ट नातं आहे.

पृथ्वी शॉ ला कमी वयात त्याच्या क्रिकेट कौशल्यामुळे प्रसिध्दी मिळाली, ज्यामुळे तो वाहत गेला आणि त्याने क्रिकेटकडे दुर्लक्ष केलं. त्याचा सराव कमी झाला आणि इतर गोष्टींना तो अधिक महत्त्व देऊ लागला. त्यानंतर त्याने मी चुकीच्या मित्रांची निवड केल्याचं देखील म्हटलं आहे. या सगळ्यामध्ये सचिन तेंडुलकरच्या त्याच्यावरील विश्वासाने त्याला बळ मिळालं.

पृथ्वी शॉ म्हणाला, सचिन सरांना माझा क्रिकेटमधील प्रवास माहित आहे. मी आणि अर्जुन 8-9 वर्षांचे असल्यापासून एकत्र खेळत मोठे झालो आहोत. सचिन सर पण काही वेळेस आमच्याबरोबर सरावासाठी तिथे असायचे. सचिन सरांशी मी बोललो होतो. दोन महिन्यांपूर्वी ते MIG च्या मैदानावर सराव करत होते आणि मी सुद्धा तिथेच होतो. तेव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली होती.

त्यांचा अजूनही माझ्यावर विश्वास आहे. सचिन सर म्हणाले, पृथ्वी, माझा तुझ्यावर विश्वास आणि तुझ्यावरचा हा विश्वास कायम असेल.’ कारण त्यांनी मला सुरूवातीपासून पाहिलं आहे. मला आजही ते हेच म्हणतात ज्या प्रकारे आधी होतास तसंच ‘पुन्हा योग्य मार्गावर ये, सर्वकाही अजूनही शक्य आहे.’ त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि ही गोष्टच माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

पृथ्वी शॉ ने आता मुंबई क्रिकेट संघाची साथ सोडली आहे. तो मुंबई सोडून आता महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---