रविवारी (दि. 16 जुलै) विम्बल्डन 2023 स्पर्धेचा अंतिम सामना लंडन येथे पार पडला. हा सामना स्पेनचा अव्वल मानांकित कार्लोस अल्कारेझ आणि द्वितीय मानांकित नोवाक जोकोविच यांच्यात खेळला गेला. या सामन्यात 20 वर्षीय कार्लोस अल्कारेझ याने अनुभवी जोकोविचला पराभूत केले. यासह त्याने जोकोविचची सलग 34 सामन्यांची विजयी मालिकाही खंडित केली. पहिल्या सेटमध्ये अल्कारेझचा पराभव झाला होता, पण नंतर त्याने दमदार पुनरागमन केले. त्याने हा सामना 1-6, 7-6 (6), 6-1, 3-6, 6-4 अशा सेटने जिंकला. हे त्याचे दुसरे ग्रँड स्लॅम, तर विम्बल्डनचा पहिला किताब होता.
या विजयानंतर कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. यामध्ये क्रिकेटच्या आजी-माजी दिग्गजांचाही समावेश होता. अल्कारेझने विम्बल्डनचा किताब जिंकल्यानंतर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही त्याचे गोडवे गायले. यावेळी सचिनने केलेले भाष्य चर्चेचा विषय ठरत आहे.
काय म्हणाला सचिन?
सचिन तेंडुलकर याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले. तो म्हणाला की, “काय शानदार अंतिम सामना होता. या दोन्ही खेळाडूंनी शानदार टेनिस सामना खेळला. आपण टेनिसच्या जगात पुढच्या सुपरस्टारच्या उदयाचे साक्षीदार बनत आहोत. मी पुढील 10 वर्षे कार्लोसची कारकीर्द फॉलो करेल. अगदी तशीच, जशी मी रॉजर फेडरर याची कारकीर्द फॉलो केली होती. खूप खूप अभिनंदन कार्लोस.”
What a fantastic final to watch! Excellent tennis by both these athletes!
We’re witnessing the rise of the next superstar of tennis. I’ll be following Carlos’ career for the next 10-12 years just like I did with @Rogerfederer.
Many congratulations @carlosalcaraz!#Wimbledon pic.twitter.com/ZUDjohh3Li
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 16, 2023
सचिनव्यतिरिक्त ‘या’ भारतीय खेळाडूनेही अल्कारेझसाठी केले ट्वीट
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यानेही ट्वीट केले. तो ट्वीट करत म्हणाला की, “ही कोणत्या खास गोष्टीची सुरुवात आहे का? फॅब 4 (फेडरर, जोकोविच, नदाल आणि मरे) यांच्यानंतर ही नवीन दौऱ्याची सुरुवात आहे! तुम्ही काय विचार करता? शाब्बास कार्लोस अल्कारेझ. जोकोविचचा शानदार प्रयत्न.”
Is this the start of something special
A new era starts post the fab 4 !
What do you'll think ?? 🤔🤔
Well done @carlosalcaraz 🫡
A great effort from @DjokerNole#Wimbledon #WimbledonFinal #wimbledon2023
— DK (@DineshKarthik) July 16, 2023
जोकोविचचे 24वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले
विशेष म्हणजे, पुरुष एकेरी टेनिसमध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावण्याचा विक्रम नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याच्या नावावर आहे. त्याच्या नावावर सर्वाधिक 23 ग्रँड स्लॅम आहेत. त्यात ऑस्ट्रेलियन ओपनचे 10, विम्बल्डनचे 7, यूएस ओपन आणि फ्रेंच ओपनमधील प्रत्येकी 3 ग्रँड स्लॅम्सचा समावेश आहे. त्याच्याकडे विम्बल्डन 2023 (Wimbledon 2023) स्पर्धेतून 24वे ग्रँड स्लॅम जिंकण्याची संधी होती. मात्र, त्याचे हे स्वप्न भंगले. (sachin tendulkar On Carlos Alcaraz said this read here)
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: अल्कारेझ बनला नवा विंबल्डन सम्राट! जोकोविचचे राज्य खालसा
पठ्ठ्याचा नादच खुळा! पाकिस्तानविरुद्ध ठोकली 10वी कसोटी Century; 7 पैकी ‘या’ देशाविरुद्ध सर्वाधिक शतके