---Advertisement---

विश्वचषकात हा संघ ठरू शकतो ‘सरप्राईज पॅकेज’, सचिन तेंडुलकरने व्यक्त केले मत

On: सोमवार, मे 27, 2019 11:47 AM
---Advertisement---

इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मेपासून 12 व्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकाबद्दल अनेक दिग्गजांनी विविध मते मांडली आहेत. तसेच अनेक अंदाजही वर्तवले आहेत.

त्याप्रमाणे भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही या विश्वचषकात अफगाणिस्तानचा संघ सरप्राईज पॅकेज ठरु शकतो, असे म्हटले आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन म्हणाला, ‘हा एक असा संघ आहे जो विश्वचषकात चकीत करु शकतो. अफगाणिस्तानकडे चांगली फिरकी गोलंदाजांची फळी आहे. जे मधल्या षटकात विकेट काढू शकतात.’

सचिनने म्हणल्याप्रमाणे अफगाणिस्तानने या दमदार सुरुवातही केली आहे. त्यांनी विश्वचषकाआधी पहिल्या सराव सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला आहे.

अफगाणिस्तानकडे राशिद खान, मुजीब उर रेहमान असे स्टार गोलंदाज आहेत. तसेच मोहम्मद नबी हा अनुभवी अष्टपैलू खेळाडू देखील आहे. या विश्वचषकात त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

अफगाणिस्तानचा विश्वचषक 2019 मधील पहिला सामना 1 जूनला ऑस्ट्रेलिया विरुद्ध ब्रिस्टोल येथे होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

–पृथ्वी शॉची दमदार कॅप्टन्सी; जिंकले टी२० मुंबई लीगचे विजेतेपद

–न्यूझीलंड विरुद्ध अर्धशतकी खेळी केलेल्या जडेजाने भारतीय फलंदाजीबद्दल केले मोठे वक्तव्य

–विश्वचषकामध्ये बांगालादेश हिरव्या जर्सीबरोबरच या नवीन जर्सीतही दिसणार खेळताना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment