---Advertisement---

एक नाही दोन नाही तर तब्बल दीड हजार क्रिकेटपटूंबरोबर सचिन खेळलाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट

On: बुधवार, जून 24, 2020 8:49 AM
---Advertisement---

भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २४ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. त्याने वयाच्या १६ व्या वर्षी नोव्हेंबर १९८९ ला पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने २४ वर्षांनी नोव्हेंबर २०१३ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

या २४ वर्षांच्या कालावधीत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० कसोटी सामने, ४६३ वनडे सामने आणि १ टी२० सामना खेळला. तसेच तो या कालावधीत २०० कसोटी सामन्यांमध्ये खेळताना एकूण ६०२ खेळाडूंबरोबर खेळला आहे. त्यात त्याच्या ११० संघसहकारी खेळाडूंचा तर ४९२ प्रतिस्पर्धी खेळाडूंचा समावेश आहे.

त्याचबरोबर सचिन ४६३ वनडे सामन्यांमध्ये मिळून ८६६ खेळाडूंबरोबर खेळला आहे. यामध्ये त्याच्या १२३ संघसहकारी खेळाडूंचा समावेश आहे. तर सचिन वनडेत ७४३ प्रतिस्पर्धी खेळाडूंविरुद्ध खेळला आहे.

तसेच सचिन एकच टी२० सामना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला असल्याने तो टी२० मध्ये एकूण २१ खेळाडूंबरोबर खेळला आहे. यात भारताचे त्याच्याव्यतिरिक्त १० खेळाडू आणि प्रतिस्पर्धी संघाचे ११ खेळाडूंचा समावेश आहे.

यातील काही खेळाडूंबरोबर सचिन क्रिकेटच्या तिनही प्रकारात खेळला आहे. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने ९८९ खेळाडूंबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे.

विशेष म्हणजे सचिन कसोटी आणि वनडेमध्ये सर्वाधिक खेळाडूंबरोबर खेळणारा क्रिकेटपटू आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

चष्मा घालुन क्रिकेट खेळले पण कामगिरीही नादबाद केलेले ५ क्रिकेटपटू, ३ नावं भारतीय

थोडे नाही तर तब्बल ७ वर्ष सचिन होता टीम इंडियातील सर्वात छोटा सदस्य

अशी कमवते बीसीसीआय करोडो रुपये, म्हणून आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---