भारतीय संघाचे दिग्गज माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या सलामी जोडीने अनेक वर्षे वनडे क्रिकेटवर राज्य केले होते. दोघांनी मिळून जगभरातील गोलंदाजांना चिंतेत टाकले होते. अशाच प्रकारे मंगळवारी (१२ मे) आयसीसीने ट्वीट करत या सलामी जोडीला सलाम केला.
आयसीसीने गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिनच्या (Sachin Tendulkar) आकडेवारीचा या ट्वीटमध्ये समावेश केला. तसेच सांगितले की, ही वनडेमधील सर्वात यशस्वी सलामी जोडी (Opener Couple) आहे. या जोडीच्या आसपासही आतापर्यंत कोणाला पोहोचता आलेले नाही.
आयसीसीने (ICC) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले की, “सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांची वनडेत १७६ भागीदारी करत ४७.५५ सरासरीने ८२२७ धावा केल्या होत्या. आतापर्यंत जगातील कोणत्याही जोडीला वनडेत ६००० धावांचा आकडा पार करता आलेले नाही.”
https://twitter.com/ICC/status/1260066504038666241
आयसीसीचे हे ट्वीट सचिनला आवडले आहे. तसेच त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केले की, “जुन्या आठवणी ताज्या झाल्या दादी. तुम्हाला काय वाटते की, आऊटसाईडच्या बाहेर ४ क्षेत्ररक्षक ठेवण्यामुळे आणि २ नवीन चेंडूसोबत आपल्याला आणखी किती धावा करता आल्या असत्या?”
https://twitter.com/sachin_rt/status/1260160328467283968
सचिनने विचारलेल्या प्रश्नावर गांगुलीने उत्तर देत ट्वीट केले की, “४००० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या असत्या. २ नवीन चेंडू. व्वा, असे वाटत आहे की, जसे पहिल्या षटकामध्ये कव्हर ड्राईव्हने चौकार ठोकला आहे. पुढच्या ५० षटकापर्यंत हेच चालू राहिले असते.”
https://twitter.com/SGanguly99/status/1260170881386475520
सचिन आणि गांगुलीने सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक धावांची भागीदारी केली आहे. १९९६ ते २००७ पर्यंत सलामीला फलंदाजी करणाऱ्या सचिन आणि गांगुलीने १३६ डावांमध्ये एकत्र सलामीला फलंदाजी केली आहे. तसेच दोघांनी ४९.३२ च्या सरासरीने ६६०९ धावा केल्या. यादरम्यान त्यांनी सर्वाधिक भागीदारी २५८ धावांची होती.
या जोडीमध्ये २१ वेळा शतकी भागीदारी झाली आहे. तर २३ वेळा दोघांनीही अर्धशतकी भागीदारी केली. सध्या भारतासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शिखर धवनची (Shikhar Dhawan) जोडी त्यांच्या सलामी विक्रमाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या दोघांनीही वनडेत सलामी भागीदारीत ४८४७ धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे सचिन गांगुलीला प्रमाणे दादी म्हणतो तर संपूर्ण जग त्याला दादा नावाने पुकारतात.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कोविड १९ पेशंटचे तापमान मोजायले जसे मशीन असते तसे क्रिकेटपटू खोटं बोलतात की नाही पहायला…
-एआर रेहमानच्या गाण्यावर थिरकला केपी, थेट रेहमाननेच केला व्हिडीओ शेअर
-कसोटीत ठरले जगातील ५ महान खेळाडू, पण वनडे करियर संपलं अचानक






