मॅच फिक्सिंगमुळे क्रिकेट जगताचे नाव अनेकवेळा खराब झाले आहे. याचा प्रत्यय सोमवारीच पहायला मिळाला. ज्यामध्ये अफगाणिस्तानचा फलंदाज शफीकउल्लाह शफीकवर मॅच फिक्सिंगमुळे ६ वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
यानंतर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि समालोचक रमीज राजाने (Ramiz Raja) हे सर्व रोखण्यासाठी आयसीसीकडे (ICC) एक मोठी मागणी केली आहे.
रमीजने आपल्या यूटयूब चॅनेलवर मोठे भाष्य करताना म्हटले की, “खेळाडूंवर लाय- डिटेक्टर टेस्टचा (Lie-Ditector Test) वापर केला जाऊ शकतो. ज्याप्रकारे डोपिंट चाचण्यांचे यादृच्छिक नमुने घेतले जातात, त्याचप्रकारे खोटेपणा शोधण्यासाठी लाय- डिटेक्टर देखील वापरावे. आपल्याला क्रिकेटच्या नियमित मोसमांमध्ये हे समजले पाहिजे की, खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये सामील झाले आहेत का?”
रमीज पुढे म्हणाला की, “माझी अशी इच्छा आहे की, याचे मोजमाप करण्यासाठी एक उपकरण असायला पाहिजे होती. ज्याप्रकारे कोविड-१९ चे तापमान मोजण्यासाठी वापरले जाते अगदी तसेच. त्यामुळे आपण अशा संशयी खेळाडूंना पकडू शकू जे नंतर फिक्सर बनू शकतात.”
“आपल्याकडे नियम आणि कायदे सर्वकाही आहे. परंतु जर कोणताही खेळाडू मॅच फिक्सिंगचा विचार करत असेल तर त्याला कोणीही थांबवू शकत नाही. फिक्सर साधारणपणे कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या खेळाडूंना किंवा युवा खेळाडूंवर आपल्या जाळ्यात अडकवतात,” असेही रमीज पुढे म्हणाला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-एआर रेहमानच्या गाण्यावर थिरकला केपी, थेट रेहमाननेच केला व्हिडीओ शेअर
-कसोटीत ठरले जगातील ५ महान खेळाडू, पण वनडे करियर संपलं अचानक