---Advertisement---

डीआरएसमधील ‘अंपायर कॉल’चा आयसीसीने पुन्हा विचार करावा, सचिन तेंडुलकरची मागणी

On: मंगळवार, डिसेंबर 29, 2020 8:36 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील दुसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे होत आहे. हा सामना अनेक बाबींमुळे क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनला असून, त्यापैकीच एक म्हणजे डीआरएस संदर्भात झालेले विवाद. आता डीआरएस संदर्भात भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन तेंडुलकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहले आहे की, डीआरएसबद्दल काही सुधारणा होणे गरजेचे आहे. सचिन म्हणतात की, ‘खेळाडू जेव्हा डीआरएस घेतो, तेव्हा तो मैदानावरील अंपायरच्या निर्णयाशी असहमत असतो. अशावेळी आयसीसीने अंपायर कॉल बद्दल आपला निर्णय बदलण्याची गरज आहे.’

अंपायर कॉलबद्दल पहिला प्रसंग घडला तो, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जो बर्न्स बद्दल. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील सुरुवातीलाच जसप्रीत बुमराह गोलंदाजीसाठी आला असता चेंडू बर्न्सच्या पॅडला लागला. भारतीय संघाने जोरदार अपील करूनही अंपायरने बर्न्सला नाबाद घोषित केले. यानंतर भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने डीआरएस घेतला. डीआरएसमध्ये दिसले की चेंडू स्टम्पला लागत होता. मात्र यावेळी अंपायर कॉल भारताच्या विरुद्ध असल्याने बर्न्सला पुन्हा नाबाद घोषित करण्यात आले.

डीआरएस संदर्भात दुसरा प्रसंग घडला मार्नस लाब्यूशानेबाबत. सिराजच्या गोलंदाजीवर चेंडू लाब्यूशानेच्या पॅडला लागला असता, अंपायरने त्याला नाबाद घोषित केले. त्यानंतर भारताने डीआरएस घेतला. डीआरएस नंतर स्पष्ट झाले की, चेंडू स्टम्पला लागत होता. मात्र तरीही अंपायार कॉल मुळे लाब्यूशानेला नाबादच घोषित करण्यात आले.

काय आहे अंपायर कॉल –

अंपायर कॉलमध्ये, जेव्हा थर्ड अंपायर कोणत्याही स्पष्ट निर्णयाबद्दल पोहोचत नाहीत तेव्हा ते मैदानावरील अंपायरच्या निर्णयाच्या बाजूनेच निर्णय देतात. पायचीतमध्ये जर चेंडू स्टम्पला हलका लागून जात असेल किंवा चेंडूचा केवळ 25 टक्के किंवा त्यापेक्षा कमी भाग स्टम्पला लागत असेल तर अंपायर कॉल असा निकाल दिला जातो.

महत्त्वाच्या बातम्या –

व्हिडिओ: बुमराहच्या बाउंसरपुढे डगमगली ऑसी क्रिकेटरची फलंदाजी, चेंडू थेट अगरवालच्या हातात

युवा ग्रीनची झुंज जडेजाने संपवली, असा घेतला झेल, पाहा

हिटमॅन आला रे! तिसऱ्या कसोटीआधी रोहित शर्मा ‘या’ दिवशी होणार टीम इंडियात सामील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---