मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर चालू असलेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीही भारतीय संघाने त्यांचा दबदबा राखून ठेवला आहे. पहिल्या डावातील १३१ धावांची पिछाडी भरुन काढत ऑस्ट्रलिया संघाने ६९ धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव चौथ्या दिवशी ६ बाद १३३ धावांपासून पुढे खेळायला सुरु केला. पण भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन ग्रीन आणि पॅट कमिन्स या जोडी सुरुवातीला यश मिळू दिले नाही. पण अखेर पहिल्या १६ षटकात विकेट न दिलेल्या कमिन्सला अखेर बाद करत चौथ्या दिवसाचा पहिला बळी भारताने मिळवला.
झाले असे की, तिसऱ्या दिवसाखेर नाबाद राहिलेली पॅट कमिन्स आणि कॅमरॉन ग्रीन यांची जोडी चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरली. संघाची परिस्थिती लक्षात घेता दोघेही विकेट वाचवून संघासाठी धावा जोडण्याचा प्रयत्नात होते. मात्र डावातील ८३वे षटक टाकण्यासाठी आलेल्या भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या बाउंसरने त्यांच्या प्रयत्नांचा चुराडा केला.
बुमराहने डावाच्या ८३व्या षटकातील पाचवा चेंडू १३० किमी दर ताशीपेक्षा जास्त वेगाने टाकले. त्यामुळे स्ट्राईकवर असलेला ऑस्ट्रेलियन गोलंदाज कमिन्स त्या वेगवान बाउंसरचा सामना करू शकला नाही. त्याने त्या चेंडूवर हलकासा शॉट मारला आणि क्षेत्ररक्षण करत असलेल्या मयंक अगरवालने सहज तो चेंडू पकडला. अशाप्रकारे एका चौकाराच्या मदतीने २२ धावा करत कमिन्स पव्हेलियनला परतला. याबरोबरच त्याची ग्रीनबरोबरची ५७ धावांची भागीदारीही संपली.
Bumrah strikes with the new ball!
A breakthrough for #TeamIndia as @Jaspritbumrah93 ends the partnership with a sharp bouncer and Cummins is OUT for 22.
AUS 156-7 and lead by 25 runs. pic.twitter.com/kger3SYO1G
— BCCI (@BCCI) December 29, 2020
https://twitter.com/KirketVideos/status/1343715462732013569
https://twitter.com/KirketVideos/status/1343703480062586880
कमिन्सनंतर अष्टपैलू ग्रीनलाही युवा भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा डाव गडगडला. अखेर ऑस्ट्रेलियाचा डाव २०० धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताला ७० धावांचे आव्हान मिळाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND v AUS Live : ऑस्ट्रेलियन शेपटाची चिवट झुंज; ऑस्ट्रलियाकडे ९८ षटकानंतर ६२ धावांची आघाडी
हिटमॅन आला रे! तिसऱ्या कसोटीआधी रोहित शर्मा ‘या’ दिवशी होणार टीम इंडियात सामील
रहाणेच्या शतकानंतर टीम इंडिया ‘अजिंक्यच’, पाहा काय आहे आकडेवारी