भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. तो मैदानावर खेळताना दिसून येत नसला तरी देखील सोशल मीडियावर चाहत्यांसोबत नेहमी जोडलेला असतो. काही दिवसांपूर्वी त्याने आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील सर्वोत्तम संघ निवडला होता. ज्यामध्ये त्याने एकही भारतीय खेळाडूला स्थान दिले नव्हते. आता नुकताच त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
सचिन तेंडुलकरचे सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. या चाहत्यांसोबत जोडून राहण्यासाठी तो नेहमीच काही ना काही शेअर करत असतो. अशातच सोमवारी (२२ नोव्हेंबर) त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ खेडे गावातील दिसून येत आहे. ज्यामध्ये दोन लहान मुलं क्रिकेट खेळताना दिसून येत आहे. तर चक्क कुत्रा यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुत्रा २ लहान मुलांसह क्रिकेट खेळण्याचा आनंद घेताना दिसून येत आहे. एक लहान मुलगा गोलंदाजी करतोय, तर लहान मुलगी फलंदाजी करताना दिसून येत आहे. तसेच कुत्रा यष्टिरक्षक आणि क्षेत्ररक्षकाची भूमिका पार पाडताना दिसून येत आहे. चेंडू जिथे जिथे जातोय, तो कुत्रा त्या चेंडूचा पाठलाग करत चेंडू पकडतोय आणि चेंडू गोलंदाजाला नेऊन देत आहे.
Received this from a friend and I must say, those are some 'sharp' ball catching skills 😉
We've seen wicket-keepers, fielders and all-rounders in cricket, but what would you name this? 😄 pic.twitter.com/tKyFvmCn4v
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 22, 2021
या व्हिडिओवर कॅप्शन देत सचिन तेंडुलकरने लिहिले की, “मित्राकडून हा व्हिडिओ मिळाला. हे पाहून मला म्हणावेच लागेल, झटपट चेंडू पकडण्याचे कौशल्य. आपण क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक, क्षेत्ररक्षक आणि अष्टपैलू खेळाडू पाहिले आहेत, पण तुम्ही याला काय नाव द्याल?” हा व्हिडिओ ५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या मजेशीर प्रतिक्रीया दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अजिंक्य रहाणे नशिबामुळे टिकून आहे भारतीय संघात? वाचा काय म्हणाले गंभीर आणि इरफान
‘चहल २०२२ टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार’, दिग्गज भारतीय यष्टीरक्षकाचा विश्वास
फिनिशर वॉचिंग फिनिशर! तमिळनाडूच्या शाहरुख खानचा विजयी षटकार धोनी पाहिला लाईव्ह, फोटो तुफान व्हायरल