इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या चार एकदिवसीय सामन्यांपैकी पहिल्या सामन्याचा अपवाद वगळता बाकिच्या तीन्ही सामन्यात इंग्लंडने 300 पेक्षा जास्त धावसंख्या उभारली आहे.
तर मंगळवार दि.19 जूनाला झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करत एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली.
या पार्श्वभूमीवर मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरने एक ट्वीट करून अलिकडे बदलेल्या आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट नियमांवर अप्रत्यक्ष टिका केली आहे. तसेच त्याने गोलंदाजांविषयी चिंता देखील व्यक्त केली आहे.
Having 2 new balls in one day cricket is a perfect recipe for disaster as each ball is not given the time to get old enough to reverse. We haven’t seen reverse swing, an integral part of the death overs, for a long time. #ENGvsAUS
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 21, 2018
गेल्या काही वर्षापासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले आहे. यामधील बदलांचा जास्तीत जास्त फटका गोलंदाजांना बसला आहे. यात मग दोन पॉवर प्ले असोत की एका इनिंगमध्ये दोेन बॉल वापरणे असो.
आयसीसीच्या नियमाप्रमाणे 2011 पासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन्ही एन्डकडून गोलंदाजीसाठी नवीन बॉल वापरण्यात येत आहे. यामुळे गोलंदाजांना शेवटच्या षटकांमध्ये मिळणारा रिव्हर्स स्विंग बंद झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–संपूर्ण यादी: पुढील पाच वर्षांचे भारतीय संघाचे वेळापत्रक घोषित
–आज भारत-पाकिस्तान सामन्याने सुरु होणार दुबई कबड्डी मास्टर्स स्पर्धा






