बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचे (सीएसी) सदस्य असणाऱ्या सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सचिन तेंडूलकरला हे पद सोडावयला लागु शकते.
बीसीसीआयच्या नविन नियमानुसार बीसीसीआयशी निगडीत कोणत्याही व्यक्तीचे १ पेक्षा जास्त उत्पन्नाची साधने ही बीसीसीआयमधून किंवा क्रिकेटशी निगडीत गोष्टींतून येणारी नसावी.
गांगुली हा बंगाल क्रिकेट असोशियशनचा अध्यक्ष आहे तसेच तो क्रिकेट एक्सपर्टही आहे. तो काही मीडिया हाऊसबरोबर जोडला गेला आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण देखील सनरायझर्स हैद्राबादचा मेंटाॅर असून क्रिकेट एक्सपर्ट म्हणुन काही मीडिया हाऊसबरोबर काम करतो.
तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जून तेंडूलकर हा १९ वर्षाखालील भारतीय संघाचा सदस्य आहे. यामुळे प्रशिक्षक किंवा निवड समिती सदस्य हे अशा कोणत्याही पदावर काम करु शकत नाही ज्यामुळे संघहिताला बाधा पोहचेल.
नरेंद्र हिरवाणी यांनी २०१५मध्ये मध्यप्रदेशच्या निवड समितीचा राजीनामा दिला होता कारण तेव्हा त्यांचा मुलगा प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत होता.
इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार सध्या भारताचे हे तीनही दिग्गज सीएसीचे मानद सदस्य (honourary basis) आहेत. गेल्यावर्षी जेव्हा त्यांना मानधनाबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी याला नकार दिला होता. तसेच बीसीसीआयनेही तेव्हा स्पष्ट केले होते की या दिग्गजांनी कोणतेही मानधन मागितले नव्हते.
परंतु यावर्षीपासून सीएसीच्या सदस्यांना मानधन दिले जाणार आहे. आणि जर या समितीचे सदस्य मानधन घेत असतील तर त्यांना अन्य क्रिकेटशी निगडीत जबाबदाऱ्या पार पाडता येणार नाही.
बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेआधी या तिनही सदस्यांना मुदतवाढीबद्दल विचारण्यात येणार आहे. त्यांनी जर याला होकार दिला तर त्यांना अन्य पदांचा राजीनामा द्यावा लागेल. तसेच नकार दिला तर तेवढ्याच तोडीच्या माजी दिग्गज खेळाडूंची यात वर्णी लावता येणार आहे.
सध्या सीएसी भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची निवड करते. २०१६ला याच समितीने अनिल कुंबळेची मुख्य प्रशिक्षक म्हणुन तर २०१७मध्ये रवी शात्रींची मुख्य प्रशिक्षक म्हणुन नेमणुक केली होती. परंतु महिला संघाच्या आजच झालेल्या प्रशिक्षक निवडीत मात्र या माजी खेळाडूंची कोणतीही भूमिका नव्हती.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–आणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली
–टीम इंडियाच्या फोटोमध्ये उपस्थित असण्याचे अनुष्काने दिले स्पष्टीकरण