भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे सुरू होणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. पहिल्या सामन्यात पराभवाबरोबरच संघाला आणखी दोन धक्के लागले आहेत. नियमित कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतला, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे.
अशा परिस्थितीत उर्वरित मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेवर दडपण असणार आहे. मात्र भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी अजिंक्यच्या नेतृत्वाचे कौतुक केले असून अजिंक्य हा आक्रमक कर्णधार आहे, असे म्हटले आहे.
एका मुलाखतीदरम्यान सचिन तेंडुलकर म्हणाले, ‘अजिंक्यने यापूर्वीही भारताचे नेतृत्व केलेले आहे. अजिंक्य स्वभावाने जरी शांत दिसत असला तरी तो आक्रमक कर्णधार आहे. आक्रमकता दाखवण्याची प्रत्येकाची वेगळी शैली असते, एखादा व्यक्ती स्वभावातून आक्रमकता दाखवत नसला, तर याचा अर्थ तो आक्रमक नाही हे मानणे चुकीचे आहे. उदाहरणार्थ चेतेश्वर पुजारा जास्त आक्रमकता दाखवत नाही, मात्र याचा अर्थ असा होत नाही की तो कोणत्याही खेळाडूपेक्षा कमी आहे ‘.
नेतृत्वाच्या बाबतीत अजिंक्यची पद्धत विराट पेक्षा वेगळी असू शकते. पण पूर्ण संघाचे लक्ष्य सामना जिंकणे हेच असेल, असेही सचिन यांनी स्पष्ट केले. सचिन म्हणाले ,’प्रत्येक व्यक्तीकडे प्रतिक्रिया देण्याची वेगवेगळी शैली असते. प्रत्येकाचे रस्ते वेगवेगळे जरी असले तरी लक्ष एकच आहे, त्यामुळे अजिंक्यची शैली वेगळी असली तरी अंतिम उद्देश संघाचा विजय हेच असेल ‘.
अजिंक्यच्या पहिल्या सामन्यातील कामगिरीचा विचार केला असता , त्याने पहिल्या डावात 42 धावांची उत्तम खेळी केली होती. दुसऱ्या डावात मात्र अजिंक्यला खाते देखील उघडता आले नाही. जॉश हेजलवूडच्या गोलंदाजीवर तो शून्यावर बाद झाला. एक कर्णधार व फलंदाज म्हणूनही उर्वरित मालिकेत अजिंक्यकडून उत्तम कामगिरीची सर्व क्रिकेटर सिकांना अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“तो काहीही करू शकतो”, बॉक्सिंग डे कसोटीत खेळण्याआधीच पंतचा ऑसी कर्णधाराने घेतला धसका
केन विलियम्सन सनरायझर्स हैदराबादमधून होणार बाहेर? वॉर्नरने दिले ‘हे’ उत्तर
‘विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे सोन्यासारखी संधी’