भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना क्रिकेट जगतावर एकप्रकारे राज्य केले होते. आपल्या २४ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सचिनने १०० शतके व तब्बल ३४,००० धावा काढल्या आहेत. या काळात सचिनने अनेक अविस्मरणीय खेळ्या केल्या होत्या. मात्र, सचिनला जेव्हा त्याच्या आवडत्या तीन खेळ्यांविषयी विचारण्यात आले, तेव्हा त्याने आपल्या तीन शतकांचा यात उल्लेख केला.
या तीन खेळ्या आहेत खास
एका मुलाखतीत सचिनला प्रश्न विचारण्यात आला की, तुझ्या अशा कोणत्या तीन खेळ्या आहेत ज्यांच्या हायलाईट्स तुला बघायला आवडतील? त्यावर उत्तर देताना सचिन म्हणाला, “तशा तर मी खेळलेल्या सर्वच खेळ्या माझ्यासाठी खास होत्या. मात्र, माझ्या आवडत्या ३ खेळ्यांविषयी विचारताल तर मी सांगेल, १९९४ मधील ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीत येथे खेळलेली ११४ धावांची खेळी माझ्यासाठी खास होती. कारण, याच खेळीमुळे मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याचा आत्मविश्वास आला. १९९९ विश्वचषकात केनिया विरुद्ध केलेली नाबाद १४० धावांची खेळी मी कधीही विसरू शकणार नाही. ही खेळी माझ्यासाठी अत्यंत भावनिक होती. माझ्या वडिलांच्या निधनानंतर हा माझा पहिलाच सामना होता. इंग्लंड विरुद्ध २००८ मध्ये खेळली गेलेली शतकी खेळीदेखील मला तितकीच जवळची आहे. कारण, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर हे माझे पहिले शतक होते.”
काही प्रेक्षणीय खेळ्यांचा केला उल्लेख
सचिनने या मुलाखतीत आपल्या कारकिर्दीतील आणखी काही प्रेक्षणीय खेळ्यांचा उल्लेख केला. त्याविषयी सचिन म्हणाला, “शारजामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९९८ साली दोन सामने खेळले गेले होते. कोकाकोला कपच्या या सामन्यांमध्ये भारताला अंतिम फेरीत जागा बनवण्यासाठी मोठ्या धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवायचे होते. सुदैवाने, मी त्या दोन्ही सामन्यात शतके ठोकली. याचबरोबर आणखी एक खेळी सांगायची झाली, तर पाकिस्तानविरुद्ध २००३ विश्वचषकात केलेली ९८ धावांची खेळी सांगेल.”
सचिनने या मुलाखतीत आपल्या पहिल्या पाकिस्तान दौऱ्यायाविषयी काही गमतीशीर किस्से सांगितले. पाकिस्तान दौऱ्यावेळी सचिन अवघ्या १६ वर्षाचा होता. या दौर्यातून सचिनला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली होती.
ट्रेंडिंग लेख-
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’
अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेल खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत