---Advertisement---

मुंबईच्या निवड प्रक्रियेवर सचिनची मोठी प्रतिक्रिया, मुलगा अर्जुनच्या पदार्पणावर पहिल्यांदाच बोलला ‘असं’ काही

On: मंगळवार, मे 24, 2022 11:56 PM
Sachin-Tendulkar-And-Arjun-Tendulkar
---Advertisement---

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मागच्या दोन हंगामांपासून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सहभागी आहे. परंतु त्याला अद्याप आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली नाहीये. आयपीएल २०२२मध्ये अनेकजण अर्जुनच्या पदार्पणाची वाट पाहत होते, पण या हंगामात देखील त्याला संधी मिळाली नाही. अर्जुनला संधी न मिळण्याविषयी सचिन तेंडुलकने पहिल्यांदाच मौन सोडले आहे.

मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२मध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी दिली, पण त्यामध्ये अर्जुनचे नाव आले नाही. यावर्षी एकूण २२ खेळाडूंनी मुंबईसाठी मैदानात प्रदर्शन केले, पण तीन खेळाडू असे होते, ज्यांना संधी मिळाली नाही. अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) देखील या तीन खेळाडूंपैकीच एक होता. मुंबईने यावर्षी अर्जुनसाठी ३० लाख रुपये खर्च केले, पण त्याचा उपयोग मात्र करून घेतला नाही.

संघात निवड न झाल्यानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) त्याच्या मुलाला म्हणाला आहे की, पुढचा मार्ग अवघड असणार आहे आणि त्यामुळे मेहनत करत राहा. सचिनने यावेळी असेही सांगितले की, तो कधीच संघाच्या निवडप्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत नाही. ‘सचिन इनसाईट’ या कार्यक्रमात बोलताना त्याला प्रश्न विचारला गेला की, अर्जुनला यावर्षी खेळताना पाहायचे आहे का? यावर सचिनने उत्तर दिले की, “हा एक वेगळा प्रश्न आहे. मी काय विचार करतो किंवा मला काय वाटते हे महत्वाचे नाहीये. हंगाम आता संपला आहे.”

“माझ्यात आणि अर्जुनमध्ये नेहमी चर्चा होते की, मार्ग अवघड होणार आहे. तू क्रिकेट खेळायला सुरुवात केली, कारण तुला ते आवडते. तुला हे करत राहावे लागेल आणि खूप मेहनत घ्यावी लागेल. परिणाम नक्कीच येईल. जर निवडप्रक्रियेविषयी बोलायचे झाले, तर मी स्वतःला कधीच या प्रक्रियेत सहभागी करत नाही. मी या सर्व गोष्टी संघ व्यवस्थापनावर सोडून देतो, कारण मी नेहमीच तसे केले आहे.”

दरम्यान, मागच्या वर्षी मुंबईकडून अर्जुनला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती, पण देशांतर्गत क्रिकेट मात्र त्याने पदार्पण केले. मुंबई संघासाठी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये २ टी२० सामने खेळले आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

बटलरचा ‘विराट’ विक्रम! ‘जोस द बॉस’ने २ षटकार ठोकताच कोहलीचा पत्ता केला कट

‘प्रत्येक बाउंड्री म्हणजे टीम सिलेक्टर्संना सणसणीत चपकार’, सॅमसनच्या रौद्र रूपाचं चाहत्यांकडून कौतुक

तुझसम तूच महान! धोनीवर कितीही टीका होऊदेत, पण प्रत्येक खेळाडूला त्याच्यासारखच बनायचंय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---