---Advertisement---

“अशा लोकांमुळे जग सुदंर” मित्राचे प्राण वाचवणाऱ्या वाहतूक पोलिस अधिकाऱ्याची भेट घेत सचिनने मानले आभार

On: मंगळवार, डिसेंबर 21, 2021 2:06 PM
Sachin-Tendulkar
---Advertisement---

काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मित्र एका अपघातात दुखापतग्रस्त झाला होता. त्यावेळी कोणी मदत करायला येण्यापूर्वी एक वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने त्याला रुग्णालयात नेले आणि त्याचे प्राण वाचवले. आता आपल्या मित्राचे प्राण वाचवणाऱ्या वाहतूक पोलिस अधिकाऱ्याचे सचिन तेंडुलकरने ट्वीट करत आभार मानले आहे. हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत वाहतूक पोलिस अधिकाऱ्याचे आभार मानले आहे. त्याने एक लेख लिहिला आहे. ज्यावर त्याने शीर्षक म्हणून, “अशा लोकांमुळेच जग खूप सुदंर आहे” असे लिहिले आहे.

त्याने या पोस्टमध्ये लिहिले की, “काही दिवसांपूर्वी माझ्या जवळच्या मित्राचा गंभीर अपघात झाला होता. देवाच्या कृपेने तो आता ठीक आहे. हे सर्व घटनास्थळी एका वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या मिळालेल्या मदतीमुळे शक्य झाले. त्यांनी (वाहतूक पोलिस अधिकारी) वेळीच योग्य निर्णय घेतला आणि दुर्घटनेत दुखापतग्रस्त झालेल्या माझ्या मित्राला रिक्षात टाकून रुग्णालयात नेले. यादरम्यान त्यांनी काळजी देखील घेतली होती की, दुखापतग्रस्त झालेल्या मित्राला जास्त त्रास नाही झाला पाहिजे.”(Sachin Tendulkar thanks cops)

https://twitter.com/MumbaiPolice/status/1472911062970167297?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1472911062970167297%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.india.com%2Fhindi-news%2Fsports-hindi%2Fcricket-news-sachin-tendulkar-thanks-traffic-cop-for-saving-his-friend-tweet-goes-viral-5147726%2F

https://twitter.com/sachin_rt/status/1471826930353655808?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1471826930353655808%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.india.com%2Fhindi-news%2Fsports-hindi%2Fcricket-news-sachin-tendulkar-thanks-traffic-cop-for-saving-his-friend-tweet-goes-viral-5147726%2F

आपल्या मित्राचा जीव वाचवणाऱ्या वाहतूक पोलिस अधिकाऱ्याची स्वतः सचिन तेंडुलकरने भेट घेतली. त्याने याबाबत ट्वीट करत लिहिले की, “मी त्यांची भेट घेतली आणि मदत केल्यामुळे मी त्यांचे आभार मानले. आपल्या चहूबाजूला त्यांच्यासारखे अनेक लोक आहेत. जे इतरांना मदत करून आपली जबाबदारी पार पाडत असतात. अशा लोकांमुळे जग सुंदर आहे. अशी सेवा करणाऱ्या लोकांचे आभार मानण्यासाठी जनतेने थोडा वेळ काढला पाहिजे.”(sachin tendulkar tweet)

सचिन तेंडुलकरने केवळ वाहतूक पोलिस अधिकाऱ्याचे कौतुकच नाही केले तर, सामान्य जनतेला वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सचिन तेंडुलकरने निस्वार्थपणे दुसऱ्यांची सेवा करणाऱ्यांचे आभार मानण्याचे आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

केवळ विराट-अश्विन नाही, तर ‘या’ भारतीय खेळाडूंनाही दक्षिण आफ्रिकेत मोठे विक्रम करण्याची सुवर्णसंधी

खेळपट्टीवर गवत पाहून भारतीय खेळाडू हैराण, द्रविडच्या ‘या’ सल्ल्याने वाढवले संघाचे मनोबल, पाहा व्हिडिओ

दक्षिण अफ्रिका दौऱ्यात पहिल्या घासाला खडा लागण्याची शक्यता; ‘हे’ आहे कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---