हॉकी विश्वचषक 2023चे आयोजन भारतातील ओडिसा राज्यात होत आहे. या विश्वचषकाला सुरुवातही झाली आहे. यामधील 4 सामने शुक्रवारी (दि. 13 जानेवारी) खेळले जाणार आहेत. यातील एका सामन्यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तो सामना म्हणजेच भारत विरुद्ध स्पेन होय. भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवत विश्वचषकाची सुरुवात थाटात करण्याचा प्रयत्न करेल. हा सामना ओडिसाच्या राऊरकेला स्टेडिअममध्ये सायंकाळी 7 वाजता खेळला जाणार आहे. हॉकी विश्वचषकात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे. अशात भारतीय संघाला मैदानात उतरण्यापूर्वी जोरदार शुभेच्छा मिळत आहेत. अनेक दिग्गज व्यक्ती आपापल्या अंदाजात हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला शुभेच्छा देत आहेत.
विराट कोहली ते सचिन तेंडुलकर अनेक खेळाडूंनी दिल्या खास शुभेच्छा
तब्बल 28 वर्षांनंतर भारतीय संघ हॉकी विश्वचषक 2023 (Hockey World Cup 2023) स्पर्धेत विजय मिळवण्यासाठी उतरत आहे. अशात संघाला विजयापूर्वीच शुभेच्छा देण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू कसे काय मागे राहतील? भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने शुक्रवारी ट्वीट करत लिहिले की, “विश्वचषकासाठी भारतीय पुरुष हॉकी संघाला माझ्या शुभेच्छा. खेळा आणि आनंद लुटा. आम्ही सर्वजण संघाला पाठिंबा देत आहोत. शुभेच्छा.”
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने ट्वीट करत लिहिले की, “भारतीय संघाला हॉकी विश्वचषकासाठी खूप खूप शुभेच्छा. आम्ही तुम्हाला चीअर करत आहोत. चक दे.”
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्ज हिने व्हिडिओ शेअर करत म्हटले की, ती भारतीय संघाच्या जर्सीसोबत हॉकी विश्वचषकासाठी तयार आहे. तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “जीतेगा भाई जीतेगा, इंडिया जीतेगा. मी हॉकी विश्वचषकात भारतीय संघाला चीअर करण्यासाठी आतुर आहे.”
याव्यतिरिक्त अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांनीही भारतीय हॉकी संघाला विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात व्हीव्हीएस लक्ष्मण यांचाही समावेश आहे.
भारतीय संघाने 28 वर्षांपूर्वी जिंकला होता हॉकी विश्वचषक
हॉकी विश्वचषकातील भारतीय संघाच्या प्रदर्शनाबद्दल बोलायचं झालं, तर भारताने आतापर्यंत फक्त एकदाच 1975मध्ये सुवर्णपदक नावावर केले होते. यानंतर भारतीय संघाला उपांत्य फेरीतही स्थान मिळवता आले नाहीये. भारताने विश्वचषकात 95 सामने खेळले आहेत. त्यात फक्त 40 सामन्यात विजय मिळवण्यात भारताला यश आले आहे. यावर्षी भारतीय संघ 28 वर्षांचा वनवास संपवण्याचा प्रयत्न करेल.
हॉकी विश्वचषकासाठी भारतीय संघ
पीआर श्रीजेश, कृष्णा पाठक, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), नीलम संजीप, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, सुखजित सिंग, राजकुमार पाल आणि जुगराज सिंग. (sachin tendulkar to virat kohli wishes team india hockey team for hockey world cup 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट आणि ईशानच्या डान्सने दणाणून सोडले ईडन गार्डन्स, बेधुंद होऊन नाचतानाचा व्हिडिओ भन्नाट व्हायरल
राहुल द्रविडने सोडली टीम इंडिया! तब्येतीच्या समस्येमुळे एकटाच बंगळुरूला रवाना, तिसऱ्या वनडेसाठी…






