आयपीएलच्या 17व्या हंगामाचा बिगूल आज वाजणार आहे. पहिला सामना गतविजेती चेन्नई सुपर किंग्ज आणि फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल. हा सामना चेन्नईचं होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी सर्व तयारी झाली आहे. सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग एकत्र कॉमेंट्री करणार आहेत.
वास्तविक, हे दोन्ही दिग्गज आयपीएलच्या पहिल्या सामन्यात जिओ सिनेमा प्लॅटफॉर्मवर हिंदी कॉमेंट्री पॅनलचा भाग असतील. यावेळी सचिन आणि सेहवाग त्यांच्या कारकिर्दीतील रंजक किस्से चाहत्यांसोबत शेअर करणार आहेत. या दोन दिग्गजांच्या कॉमेंट्रीचा आस्वाद घेण्याची संधी चाहत्यांना मिळाली, असे फार कमी प्रसंग आले आहेत.
याशिवाय चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जिओ सिनेमानं काही सोशल मीडिया स्टार्स आणि बॉलीवूड गायकांनाही पहिल्या सामन्यासाठी आमंत्रित केलंय. यामध्ये सोशल मीडिया सेन्सेशन ओरीचं नावही सामील आहे. याशिवाय प्रसिद्ध रॅपर ‘बादशाह’ देखील आपल्या हरियाणवी कॉमेंट्रीद्वारे चाहत्यांचा उत्साह वाढवताना दिसेल. तसेच UK07 Rider, Techno Gamerz, शिव ठाकरे, लक्ष्मी मंचू सारखे युटयूबर्स देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करतील. कॉमेडियन आणि बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकी अजय जडेजासोबत गुजरातीमध्ये कॉमेंट्री करणार आहे.
आयपीएलच्या या हंगामात जिओ सिनेमाच्या कॉमेंट्री पॅनलमध्ये ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, सुरेश रैना, अनिल कुंबळे, शेन वॉटसन, माइक हसन, इऑन मॉर्गन, रॉबिन उथप्पा, जहीर खान, ग्रॅमी स्मिथ, ब्रेट ली, स्कॉट स्टायरिस, पार्थिव पटेल, अजय जडेजा आणि आकाश चोप्रा यांसारख्या दिग्गज नावांचा समावेश आहे. हे अनुभवी क्रिकेटपटू संपूर्ण स्पर्धेत समालोचनासह चाहत्यांचं मनोरंजन करतील. तसेच प्रत्येक सामन्याशी संबंधित महत्त्वाची माहिती आणि विश्लेषणावर देखील चर्चा होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलचं समालोचन पॅनेल जाहीर; सुनील गावसकर, रवी शास्त्रींसह अनेक दिग्गज घेणार हातात माईक
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘हा’ 41 वर्षीय खेळाडू असेल भारताचा ध्वजवाहक, मेरी कोमकडेही मोठी जबाबदारी
चेन्नईचं कर्णधारपद सोडल्यानंतर काय आहे धोनीचा भविष्यातील प्लॅन? ऋतुराजकडे नेतृत्व का दिलं?