---Advertisement---

भारताच्या विश्वचषकातील कामगिरीवर ‘क्रिकेटचा देव’ भलताच खुश; म्हणाला, ’14 ऑक्टोबरची…’

Sachin-Tendulkar
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाने दोन सामने खेळले आणि दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारताचा महान फलंदाज आणि ‘मास्टर ब्लास्टर’ म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर खूपच खुश झाला आहे. सचिनने भारताच्या चांगल्या प्रर्दशनासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट आता जोरदार व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे.

सचिनची पोस्ट
अफगाणिस्तानविरुद्ध भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला. या खास विजयानंतर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) म्हणाला की, “जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांनी चांगलं प्रर्दशन केलं. या दोघांना फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागातून चांगली साथ मिळाली. आपल्याला भारताच्या दोन्ही सामन्यांत वेगवेगळ्या खेळाडूंनी योगदान दिल्याचे पाहायला मिळाले. यामुळे 14 ऑक्टोबरची तयारी जोरदार झाली आहे.”

लक्षणीय बाब म्हणजे, विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गोलंदाजीत फिरकीपटू आणि फलंदाजीत विराट कोहली तसेच केएल राहुल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून दिला. याव्यतिरिक्त दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या 4 विकेट्स आणि रोहित शर्माची तुफानी शतकी खेळी विजयाचे कारण ठरली. त्यामुळे आता असं म्हटलं जाऊ शकतं की, भारताचे सर्वच खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

विश्वचषक 2023 मध्ये 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे महामुकाबला होणार आहे. या सामन्याचा पहिला चेंडू दुपारी 2 वाजता टाकला जाईल. या सामन्यासाठी पाकिस्तान आणि भारतीय संघ अहमदाबाद येथे पोहोचले आहेत. तसेच, पाकिस्तान संघाने सरावही सुरू केला आहे. (Sachin Tendulkar was happy with Indias performance in the World Cup 2023)

हेही वाचा-
मोठी बातमी! ‘या’ दौऱ्यासाठी पाकिस्तान संघ जाहीर, वर्षभरानंतर अनुभवी खेळाडूचे पुनरागमन
‘शुबमन बाहेर पडला तर भारताला फरक पडला नाही अन् नसीममुळे आम्हाला…’, शोएब मलिकचे मोठे विधान

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---