---Advertisement---

घरच्या लग्नात फेटा घालून सहभागी झाला मास्टर ब्लास्टर, साराच्या लूकवरही नेटकरी फिदा

On: बुधवार, ऑगस्ट 10, 2022 1:11 PM
sachin tendulkar and sara tendulkar
---Advertisement---

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. तो त्याच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधिंत गोष्टी चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असतो. अनेकदा त्याला मराठमोळ्या पारंपारिक कपड्यांमध्ये पाहिले गेले आहे. मंगळवारी देखील सचिन घरच्या लग्नासाठी अशाच पारंपारीक कपड्यांमध्ये तयार झाला होता. त्याची मुलगी सारा तेंडुलकरचे फोटोही समोर आले आहेत. 

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मोठा भाऊ नितिन तेंडुलकर यांच्या मुलीचे लग्न मंगळवारी (९ ऑगस्ट) झाले. याच घरच्या कार्यक्रमासाठी सचिन आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित असल्याचे समजते. सचिनने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एका दुसऱ्या व्यक्तीकडून फेटा बांधून घेत आहे. सचिनने व्हिडिओत फेटा बांधण्याचे आणि त्याने घातलेल्या पारंपारिक कपड्यांचे कारणही स्पष्ट केले.

व्हिडिओत सचिन तेंडुलकर खुर्चीवर बसला आहे. दुसरा एक व्यक्ती त्याला फेटा बांधण्याचे काम करत आहे. यादरम्यान सचिन म्हणतो की, “आज माझा मोठा भाऊ नितिन याची मुलगी करिश्माचे लग्न आहे, त्यामुळेच हा फेटा बांधत आहे.” व्हिडिओत सचिनच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत आहे. हा लग्न समारंभ पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडल्याचे समजते.

https://www.instagram.com/reel/ChCgLHhgLlx/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, सचिनव्यतिरिक्त सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) देखील या लग्नात चर्चेत राहिली. सारा गुलाबी रंगाच्या साडीमध्ये दिसली. सारा पुर्णपणे पारंपारीक लूकमध्ये दिसली नाही, पण आपण त्याला मराठी लुक नक्कीच म्हणू शकतो. साराच्या मेकअप आर्टिस्टने तिचा फोटो शेअर केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

sara tendulkar
Photo Courtesy : Instagram:Sara Tendulkar/screengrabs

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. चाहत्यांमध्ये तिची मोठी क्रेझ पाहिली गेली आहे. इंस्टाग्रामवर २.२ मिलियन चाहते साराच्या अधिकृत खात्याला फॉलो करतात.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

जबरच! फलंदाजाने केलाय नव्या शॉटचा अविष्कार, आयसीसीलाही घ्यावी लागली दखल

भारतीय संंघात का होतायत सातत्याने बदल? कर्णधार रोहित शर्माने स्पष्टच सांगितले

एकेकाळी विराटसोबत क्रिकेट खेळलेला पठ्ठ्या दुसऱ्यांदा बनणार बिहारचा उपमुख्यमंत्री, आयपीएलशीही जुने नाते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---