---Advertisement---

मास्टर ब्लास्टर सलग दुसऱ्यांचा भारताला बनवणार चॅम्पियन! करणार ‘या’ संघाचे नेतृत्व

On: बुधवार, ऑगस्ट 31, 2022 5:55 PM
sachin tendulkar road saftey world series
---Advertisement---

भारतीय संघाचा मजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर लवकरच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये खेळताना दिसेल. सचिन यावर्षी पुन्हा एकदा या लीगमध्ये कर्णधाराच्या रूपात खेळणार आहे. माध्यांमांतील वृत्तांनुसार इंडिया लेजेंड्स संघाला पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून देण्यासाठी सचिन तेंडुलकर कर्णधराची भूमिका पार पाडणार आहे. यापूर्वी त्याच्याच नेतृत्वात भारताने या लीगचे विजेतेपद पटकावले होते. 

रोड सेफ्टी सीरीजच्या (Road Safety World Series) वर्षीच्या हंगामात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नेतृत्वातील इंडिया लेजेंड्स संघाने अंतिम सामन्यात श्रीलंका लेजेंड्स संघाला मात दिली होती. अंतिम सामना भारताने 14 धावांच्या अंतराने जिंकला होता. विजयासाठी युवराज सिंघ आणि युसूफ पठाण यांचे योगदान महत्वाचे ठरले होते. या दोघांनी देखील अर्धशतकी खेळी केली आणि इंडिया लेजेंड्स संघाला विजय मिळवून दिला होता.

यावर्षी रोड सेफ्टी सीरीजचे सर्व सामने लखनऊ, जोधपुर, कटक आणि हैदराबाद या शहरांमध्ये खेळले जातील. हंगामातील पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी लखनऊ शहरात खेळला जाणार आहे. तसेच अंतिम सामना 2 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये खेळला जाईल. माहितीनुसार लखनऊमध्ये एकूण 7 सामने खेळले जातील. कटक शहरात 6 सामने होतील आणि अंतिम सामन्यासाठी संघ हैदराबादला रवाना होणार असल्याचे सांगितल गेले आहे. लखनऊ आणि कटक शहरांमध्ये प्रत्येकी एक-एक डबल हेडर पार पाडतील. तसेच जोधपूरमध्ये २ डबल हेडर आयोजित केले गेले आहेत. उपांत्य सामने 29 आणि 30 सप्टेंबर रोजी होतील.

दरम्यान, वर्ड सेफ्टी सीरीजमध्ये भारतीय संघासाठी त्याच्या कारकिर्दीत 100 शतक करणाऱ्या सचिन तेंडुलकरसोबतच इतरही काही मोठे चेहरे खेळताना दिसतील. स्पर्धेत खेळणारे सर्वजण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले आहेत. यामद्ये प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे इरफान पठाण, युवराज सिंग, युसूफ पठाण आणि मोहम्मद कैफ यांचा. हे सर्वजन रोड सेफ्टी सीरीजच्या आगामी हंगामात तापडतोड प्रदर्शन करतील अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. भारतीय संघाचे प्रदर्शन करताना एकापेक्षा एक मोठे विक्रम करणाऱ्या सचिन तेंडुकरच्या प्रदर्शनावर देखील सर्वांचे लक्ष्य लागून असेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

एका खेळीने हार्दिक पंड्याची आयसीसी क्रमवारी सुधारली! पोहोचलाय कारकिर्दीच्या सर्वोत्कृ्ष्ट क्रमांकावर
‘त्यांच्याकडे ती कला आहे!’ भारताच्या स्टार ऑलराऊंडरने केलं अफगाणिस्तान संघाचे कौतुक 
Asia Cup | कॅप्टन कूलपेक्षा हिटमॅन ठरणार वरचढं! फक्त करावे लागणर ‘हे’ सोपे काम 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---