क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांनी निवृत्ती घेतल्यानंतर चाहत्यांना त्यांना खेळताना पाहाता येत नाही. मात्र, २०२०-२१ मध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे त्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले अनेक दिग्गजांना पुन्हा मैदानावर चाहत्यांना पाहाता आले होते. या क्रिकेटपटूंमध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर खास आकर्षण होता. मात्र, यावेळी तो या स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात खेळताना दिसणार नसल्याचे बोलले जात आहे.
खेळाडूंची थकबाकी
खरंतर सचिनने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेण्यामागे थकबाकी हे मोठे कारण असल्याचेही म्हटले जात आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक खेळाडूंना अजून पूर्ण कराराची रक्कम मिळालेली नाही. या स्पर्धेत खेळलेल्या अनेक खेळाडूंनी पहिल्या सत्रातील थकबाकी असल्याची तक्रार केली आहे. सचिनलाही त्याच्या कराराची रक्कम मिळालेली नाही.
याशिवाय बांगलादेशममधील काही माध्यमांतील वृत्तानुसार देखील खलीद मेहमुद, मेहरब हुसैन, रजिन सालेह, हन्नाह सरकार आणि नफिस यांसारख्या खेळाडूंनाही मानधन मिळालेले नाही.
या प्रकरणाबाबत एका सुत्राने पीटीआयला माहिती दिली आहे की, ‘सचिन पुढील रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिजचा भाग असणार नाही. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये १ ते १९ मार्च दरम्यान होणार आहे. पण सचिन कोणत्याच भूमिकेत या स्पर्धेचा भाग नसणार.’
तसेच सुत्रांनी सांगितले की, ‘हो, सचिन त्या क्रिकेटपटूंमध्ये सामील आहे, ज्यांना आयोजकांकडून पूर्ण मानधन मिळालेले नाही. जर कोणती माहिती हवी असेल, तर रवी गायकवाज यांना संपर्क करावा लागेल. ते या स्पर्धेचे आयोजक होते.’
अधिक वाचा – खुद्द ब्रँड अँबेसेडर अमिताभ यांनाही मिळाली चुकीची माहिती, ‘या’ लीगमध्ये सहभागी नाही होणार सचिन
या स्पर्धेच्या पहिल्या हंगामात प्रत्येक खेळाडूला करारानंतर १० टक्के मानधन देण्यात आले होते. त्यानंतर २५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ४० टक्के मानधन देण्यात येणार होते, तर उर्वरित ५० टक्के मानधन ३१ मार्च २०२१ पर्यंत दिले जाणार होते.
या स्पर्धेच्या पहिल्या हंगामासाठी सचिन इंडिया लिजंड्स या भारताचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या संघाचा कर्णधार होता. तसेच तो स्पर्धेचा ब्रँड अँबेसेडरही होता. तसेच या स्पर्धेचे आयुक्त म्हणून सुनील गावसकरांनी काम पाहिले होते.
व्हिडिओ पाहा – सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी
सचिन होता ब्रँड अँबेसेडर
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिजचा पहिला हंगामातील पहिला टप्पा २०२० मध्ये खेळवण्यात आला होता. पण काही सामन्यांनंतर कोरोना व्हायरसचे संकट आल्याने स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर २०२१ साली ही स्पर्धा पुन्हा सुरू झाली. या स्पर्धेत इंडिया लिजेंड्स आणि श्रीलंका लिजेंड्स या संघांनी अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात सचिनच्या नेतृत्त्वाखाली इंडिया लिजेंड्सने विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. या स्पर्धेत इंडिया लिजेंड्सकडून विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, झहिर खान असे अनेक भारतीय दिग्गज खेळले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमीः ‘रोहितसेने’साठी विश्वचषकाचा पहिला टप्पा आहे सोप्पा, भारताच्या ‘अ’ गटात आहेत हे संघ
मोठा बातमीः भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने, याचवर्षी ‘या’ दिवशी खेळणार सामना
टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचे वेळापत्रक घोषित; भारत-पाकिस्तान सामना रंगणार ‘या’ दिवशी