India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड यांच्यात 1932 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला गेला होता. या दोन्ही संघांमध्ये शेवटची टक्कर 2022 मध्ये झाली होती. या 90 वर्षांत या दोन संघांमध्ये एकूण 131 कसोटी सामने खेळले गेले. येथे इंग्लंडने 50 तर भारताने 31 सामने जिंकले होते. भारत-इंग्लंड कसोटीच्या या प्रदीर्घ इतिहासात, येथे जाणून घेऊया की, सर्वाधिक धावा करण्यापासून ते विकेट घेण्यापर्यंतच्या 10 प्रमुख पॅरामीटर्समध्ये कोण अव्वल आहे.
1. सर्वोच्च धावसंख्या: हा विक्रम भारतीय संघाच्या नावावर आहे. डिसेंबर 2016 च्या चेन्नई कसोटीत भारतीय संघाने 7 विकेट्स गमावून 759 धावांवर डाव घोषित केला होता.
2. सर्वात कमी स्कोअर: हा लाजिरवाणा विक्रमही भारताच्या नावावर आहे. जून 1974 मध्ये झालेल्या लॉर्ड्स कसोटीत भारत अवघ्या 42 धावांत गारद झाला होता.
3. सर्वात मोठा विजय: जून 1974 मध्ये झालेल्या लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने भारताचा एक डाव आणि 285 धावांनी पराभव केला. हा अजूनही भारत-इंग्लंड कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे.
4. सर्वात लहान विजय: डिसेंबर 1972 मध्ये ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ फक्त 28 धावांनी जिंकला होता.
5. सर्वाधिक धावा: सचिन तेंडुलकर येथे नंबर 1 आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध 32 सामन्यांच्या 53 डावांत 2535 धावा केल्या आहेत. या काळात त्याची फलंदाजीची सरासरी 51.73 होती.
6. सर्वात मोठी खेळी: इंग्लंडच्या ग्रॅहम गूचने जुलै 1990 मध्ये लॉर्ड्स कसोटीत 333 धावांची इनिंग खेळली होती.
7. सर्वाधिक शतके: इंग्लंडच्या जो रूटने भारताविरुद्ध आतापर्यंत 9 शतके झळकावली आहेत.
8. सर्वाधिक विकेट्स: महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या नावावर भारताविरुद्धच्या 35 कसोटी सामन्यांमध्ये 139 विकेट्स आहेत.
9. सर्वोत्तम गोलंदाजी: इंग्लिश गोलंदाज फ्रेडरिक ट्रुमनने जुलै 1952 च्या मँचेस्टर कसोटीत एका डावात केवळ 31 धावा देऊन 8 भारतीय फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.
10. सर्वात मोठी भागीदारी: येथे देखील इंग्लिश खेळाडू आघाडीवर आहेत. केविन पीटरसन आणि इयान बेल यांनी ऑगस्ट 2011 मध्ये ओव्हल कसोटीत तिसऱ्या विकेटसाठी 350 धावांची भागीदारी केली होती. (Sachin tops in runs Anderson top in wickets 10 Biggest Records in India-England Test History)
हेही वाचा
पाकिस्तानचा दिग्गज बनला कोहलीचा फॅन, वाचा विराटला शतकातील सर्वोत्तम फलंदाज का म्हणाला
PAK vs NZ: पाकिस्तानकडून 5व्या टी20 मध्ये न्यूझीलंडचा मोठा पराभव, विश्वचषकानंतर मिळवला पहिला विजय