---Advertisement---

सौराष्ट्रने गमावला माजी रणजीपटू, डीएसपी म्हणून होते कार्यरत

On: मंगळवार, जानेवारी 4, 2022 1:37 PM
---Advertisement---

गेल्या २ वर्षात कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांना कोरोनामुळे जीवही गमवावा लागला आहे. यात काही खेळाडूंचाही समावेश आहे. आता नुकतेच असे समोर आले आहे की, सौराष्ट्र क्रिकेटचे माजी रणजीपटू अंबाप्रतापसिन्हाजी जडेजा यांचे कोविड-१९ चा संसर्ग झाल्याने निधन झाले आहे. ते ६९ वर्षांचे होते. 

अंबाप्रतापसिन्हाजी यांचे मंगळवारी (४ जानेवारी) सकाळी कोविड-१९ विरुद्ध लढा देताना निधन झाले, याबद्दल सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने प्रसिद्धीपत्रक जाहीर करत माहिती दिली.

जामनगरमधील रहिवासी असलेले जडेजा हे उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करायचे, तसेच उजव्या हाताने फलंदाजी करायचे. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सौराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. तसेच त्यांनी सौराष्ट्रकडून ८ रणजी ट्रॉफी सामने खेळले होते. यामध्ये त्यांनी १०० धावा केल्या होत्या आणि १० विकेट्स काढल्या होत्या.

याशिवाय अंबाप्रतापसिन्हाजी हे गुजरात पोलीस खात्यात पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी ते या पदावरून निवृत्त झाले.

त्यांच्या निधनाबद्दल सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दु:ख व्यक्त केले आहे. तसेच बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शहा यांनी देखील दु:ख व्यक्त करताना म्हटले आहे की, ‘अंबाप्रतापसिन्हाजी हे प्रतिभाशाली खेळाडू होते. मी त्यांच्यासोबत क्रिकेटचे चांगले क्षण अनुभवले आहेत. आशा आहे की, त्यांच्या आत्म्यास शांती मिळेल.’

यापूर्वीही सौराष्ट्रचेच माजी अष्टपैलू क्रिकेटपटू राजेंद्र जडेजा यांचे देखील कोविड-१९ मुळे गेल्यावर्षी निधन झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

नाणेफेक होण्याच्या काही मिनिटांपूर्वी विराटने रहाणेला सांगितले नक्की कुठे होतोय त्रास

बुम बुम बुमराह!! रबाडाच्या बाऊन्सरवर बुमराहचा कडक षटकार; पत्नी संजनाने दिली अशी रिॲक्शन

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मोठा खुलासा, भारतीय दौऱ्यावर झाले होते लैंगिक शोषण

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---