क्रिकेटच्या मैदानावर घडलेल्या काही घटनांचा खुलासा हा त्यानंतर अनेक वर्षांनी होताना आपण पाहतो. हे खुलासे कधी धक्कादायक तर कधी मजेशीर असतात. पाकिस्तान संघाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सईद अजमल याने असाच एक मोठा खुलासा केला. हा खुलासा भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याच्याविषयी आहे.
अजमलचा मोठा उलगडा
पाकिस्तान संघाचा माजी फिरकीपटू सईद अजमल याने भारतीय संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याच्याविषयी खुलासा करताना म्हटले आहे की, सचिनने मला जाणीवपूर्वक खराब गोलंदाजी करण्यास सांगितले होते.
एका पाकिस्तानी पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, “आम्ही एकदा एमसीसीसाठी एकत्रितरित्या लंडन येथे एक प्रदर्शनीय सामना खेळत होतो. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंपुढे मी चांगली गोलंदाजी करत झटपट ४ फलंदाजांना बाद केले होते. त्यानंतर सचिन धावत माझ्याकडे आला आणि म्हणाला, सईद भाई हे काय करत आहेस तू? या सामन्याला तितक्या गंभीरतेने घेऊ नको. आपण येथे लोकांचे मनोरंजन करण्यासाठी आलो आहोत. हा प्रदर्शनीय सामना आहे. हा सामना लोकांसाठी असून संध्याकाळपर्यंत संपवायचा नाही. तू तर लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करतोय.”
अजमलने आपली बात पुढे नेताना म्हटले, “यावर मी सचिनला म्हणालो होतो की, माझ्यासमोरचे सर्व फलंदाज दर्जेदार आहेत म्हणून मी अशी सकारात्मक गोलंदाजी करतोय. त्याला देखील माझी ही गोष्ट पटली होती. मात्र त्याने सांगितले की, सामना जितका उशिरापर्यंत चालेल तितकी जास्त मदत त्या लोकांना होणार आहे. त्यानंतर मी काहीशी साधारण गोलंदाजी केली होती.”
Why sachin Tendulkar stopped Saeed Ajmal for good bowling during a match ? pic.twitter.com/jTtdeNVW2m
— Saleem Khaliq (@saleemkhaliq) May 23, 2021
सईद अजमल सांगत असलेला सामना हा २०१४ मध्ये एमसीसी इलेव्हन विरुद्ध रेस्ट ऑफ वर्ल्ड असा झाला होता. या सामन्यात सचिन एमसीसीचे नेतृत्व करताना दिसलेला. लंडन येथे झालेल्या या सामन्यात एमसीसीने ७ गड्यांनी विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
एकाच डावात ३ बोल्ड अन् ३ कॅच, ‘या’ बांगलादेशी गोलंदाजाने अक्रमच्या खास विक्रमाची केली पुनरावृत्ती
गुणी मुलगी! आपल्या वडिलांची ‘ही’ इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रीति झिंटाने खरेदी केली होती आयपीएल टीम
विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात कशी असेल भारताची सलामी जोडी? ‘हे’ आहेत ४ पर्याय