जर पाकिस्तानच्या सर्वोत्तम फिरकीपटूंची यादी काढली, तर त्या यादीत सईद अजमल याचे नाव नक्की असणार. एकेकाळी त्याच्या फिरकीने फलंदाजांना धडकी भरायची. मात्र, त्याच सईद अजमलने आपल्या पदार्पणाबद्दल संघ व्यवस्थापनावर गंंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तो म्हणाला की जेव्हा तो भारताविरुद्ध पदार्पण करणार होता तेेव्हा त्याला सामन्याआधीच सांगण्यात आले होते की हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरु शकतो.
सईद अजमल (Saeed Ajmal) याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी20 सामना 2008मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. तसेच त्याने भारताविरुद्ध 2008मध्ये आशिया चषकाच्या एकदिवसीय सामन्यात आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले. त्यानेे आपल्या कारकीर्दीत बरेच मैलाचे दगड पार केेले आणि 2017मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली.
मला सांगितलेे गेेले होते की हा माझा शेवटचा सामना असू शकतो- सईद अजमल
नुकतेच अजमल याने आपल्या पदार्पणातील एकदिवसीय सामन्याबद्दल एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यंमांशी बोलताना तो म्हटला की, “मला माझा पहिला सामना भारताविरुद्ध खेळणार होतो. पदार्पणाच्या आधी मला सांगण्यात आले की हा माझा पहिला आणि शेवटचा सामना असणार आहे. ते म्हणाले की जर मी या सामन्यात चांगले प्रदर्शन केले तर मला पुढे खेळवण्यात येईल आणि जर चांगले प्रदर्शन करण्यात अपयशी झालो तर पुढे संधी मिळणार नाही. तो सामना भारताच्या विरुद्ध होता, जो सामना जगातील प्रत्येक माणूस पाहू ईच्छितो. जेव्हा मी आत गेलो तेव्हा मला क्रॅंप आले होते. तेव्हा मिस्बाह कर्णधार होते आणि मला त्यांनी सांगितले की मला पॉवरप्लेमध्येही षटक टाकावे लागणार आहे. मी म्हणालो की मला क्रॅंप येत आहेत आणि आता षटक टाकून जाऊ द्या. त्यावर ते म्हणाले की मला शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी बोलवल्या जाईल. ”
या सामन्यात सईद अजमल याने 47 धावा देत 1 गडी बाद केलेला. त्याला 47व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी सांगितले होते आणि त्या षटकात त्याने यूसुफ (Yusuf Pathan) पठाण याची महत्वाची विकेट मिळवली. भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत 308 धावा केल्या होत्या, तरीही भारताला पराभव स्वीकारावा लागला. यूनिस खान (Younis Khan) याच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने 8 गडी राखून विजय मिळवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू…डोक्यावर घेऊ नको’, द्विशतकानंतर ईशानने फोन करताच ‘अशी’ होती वडिलांची प्रतिक्रिया
FIFA WC 2022: पोर्तुगलच्या पराभवानंतर एकच गोंधळ, रोनाल्डोला बाकावर बसवणाऱ्या हेड कोचला दिला नारळ