क्रिकेटच्या इतिहासात ६ सप्टेंबर हा दिवस खूप खास आहे. कारण याच दिवशी १९६८ मध्ये पाकिस्तान संघाचे दिग्गज क्रिकेटपटू सईद अनवर यांचा जन्म झाला होता. तसं सईद अनवरचे कुटुंब मुळचे तेहरानमध्ये होते. परंतु, त्यानंतर त्यांचे कुटुंब पाकिस्तानात स्थायिक झाले होते. सईद अनवर यांनी आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तान संघाला अनेकदा विजय मिळवून दिले. यासह त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये दिग्गज फलंदाज म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
वनडे क्रिकेटमध्ये तब्बल १२ वर्ष सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर असणारे सईद अनवर आपला ५३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी १९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. परंतु, वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात अवघ्या ३ धावा करण्यात यश आले होते. परंतु, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले. त्यानंतर २००३ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते.
भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये १९९४ मध्ये चेन्नईच्या मैदानावर वनडे सामना पार पडला होता. या सामन्यात सईद अनवर यांनी १९४ धावांची तुफानी खेळी केली होती. सलामीला फलंदाजीला येऊन १९४ धावांची खेळी करत त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळण्याचा पराक्रम केला होता.
त्यानंतर २००९ मध्ये झिम्बाब्वेचा फलंदाज चार्ल्स कोवेंट्रीने १९४ धावांची खेळी करत सईद अनवर यांच्या विक्रमाची बरोबरी केली होती. तर २०१० मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध २०० धावांची खेळी करत हा विक्रम मोडला. त्यानंतर अनेक फलंदाजांनी २०० धावा करण्याचा पराक्रम केला आहे.
सईद अनवर यांनी २००३ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तुफानी शतक झळकावले होते. परंतु, ही शतकी खेळी वाया गेली होती. कारण भारतीय संघाने या सामन्यात पाकिस्तान संघाला पराभूत केले होते. त्यानंतर त्याच्या मुलीचे अकाली निधन झाले होते. ज्यामुळे त्याचा कल धर्माकडे अधिक वाढला होता. त्यांनी आपली दाडी वाढवली आणि तबलीकी धर्माचा देखील स्वीकार केला होता. त्यानंतर त्यांनी धार्मिक प्रवचन द्यायला देखील सुरुवात केली होती. (Saeed Anwar Pakistan batsman born who scored 194 against India at Chennai)
सईद अनवर यांची कारकीर्द
सईद अनवर यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी एकूण ५५ कसोटी सामने आणि २४७ वनडे सामने खेळले होते. त्यांनी ५५ कसोटी सामन्यात ४०२५ केले होते. यादरम्यान त्यांनी ११ शतक आणि २५ अर्धशतक झळकावले होते. तसेच २४७ वनडे सामन्यात त्यांनी ८८२४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांनी २० शतक आणि ४३ अर्धशतक केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रैना इज बॅक! सीएसकेची जर्सी घालून सरावात गाळतोय घाम; पाहा व्हिडिओ
Video: मोहम्मद रिजवानने भारतीय मुलीला घातला दंडवत, वाचा काय आहे प्रकरण
अर्शदीप सिंग | गोलंदाजाला समर्थन देण्यासाठी माजी दिग्गजाने थेट प्रोफाईल फोटोच बदलला