बेंगलोर येथे खेळल्या जात असलेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच सॅफ फुटबॉल कपमध्ये शनिवारी (24 जून) भारत विरुद्ध नेपाळ असा सामना खेळला गेला. भारतीय संघाने सलग दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवला. या सामन्यात भारताने नेपाळचा 2-0 असा पराभव केला. सुनील छेत्री याने भारतासाठी गोल झळकावला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत मजल मारली.
https://www.instagram.com/p/Ct4S-_FRkT3/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
भारतीय संघाने आठवडाभर आधी इंटर कॉन्टिनेन्टल कप आपल्या नावे केला होता. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी झालेला. भारतीय संघाने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवताना पाकिस्तानला 4-0 असे पराभूत केलेले.
बेंगलोर येथील श्री कांतिरवा स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाला नेपाळने चांगलीच झुंज दिली. या सामन्यात भारत पहिल्या हाफमध्ये एकही गोल करू शकला नाही. दुसऱ्या हाफच्या पहिल्या वीस मिनिटात देखील नेपाळने जबरदस्त बचाव दाखवला. मात्र, सुनील छेत्रीने 65 व्या मिनिटाला हा बचाव घेतात भारतासाठी पहिला गोल नोंदवला. त्यानंतर पाच मिनिटांनी मनवीर सिंग याने देखील गोल करत भारताची आघाडी वाढवली. उर्वरित वेळेत गोल न झाल्याने सामना भारतीय संघाने आपल्या नावे केला.
बातमी अपडेट होत आहे
(SAFF CUP 2023 India Beat Nepal 2-0 Sunil Chhetri Score Again)