---Advertisement---

साहाने केलेला रन-आऊट बघून धोनीला विसरून जाल; व्हिडिओ झाला व्हायरल

On: शनिवार, डिसेंबर 19, 2020 3:44 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ गडी राखून पराभव करत, मालिकेत १-० ने आघाडी घेतली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा दुसरा डाव ३६ धावांवर गुंडाळत, भारताने दिलेले ९० धावांचे आव्हान दोन गड्यांच्या मोबदल्यात पार करत सामना आपल्या नावे केला. याचवेळी, ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात भारतीय यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने ऑस्ट्रेलियन सलामीवीर मॅथ्यू वेडला धावबाद करताना दाखवलेली चपळाई पाहून सर्वांना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची आठवण झाली.

ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी केली नेटाने फलंदाजी
ऍडलेड कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांवर संपुष्टात आला. जोस हेजलवूड व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी ५ व ४ बळी घेत भारताला आत्तापर्यंतच्या नीच्चांकी धावसंख्येवर बाद केले. त्यानंतर, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन सलामीवीर मॅथ्यू वेड आणि ज्यो बर्न्सने नेटाने फलंदाजी करत भारताने दिलेले ९० धावांचे लक्ष्य लवकरात लवकर पार करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले.

साहाने चित्त्याच्या चपळाईने केले वेडला धावबाद
दोन्ही सलामीवीरांनी १७ षटकांत ७० धावा फलकावर लावल्या होत्या. अॉस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील १८ वे शतक टाकण्यासाठी भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन गोलंदाजीसाठी आला. षटकातील दुसऱ्या चेंडूवर मॅथ्यू वेडने मारलेला चेंडू शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या पृथ्वी शॉच्या पायाला लागून काहीसा दूर गेला. यादरम्यान वेड धाव घेण्यासाठी काही पावले पुढे गेला. इतक्यात यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने चित्त्याच्या चपळाईने यष्ट्यांकडे न पाहता स्वतःच्या पायांमधून अचूकरित्या चेंडू यष्ट्यांवर मारत वेडला धावबाद केले.

ऑस्ट्रेलियाने सामना केला आपल्या नावे
वेड बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मार्नस लॅब्युशेन सहा धावा काढून बाद झाला. अखेरीस ज्यो बर्न्स व स्टीव स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. पहिल्या डावात नाबाद अर्धशतक झळकावणारा ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन सामनावीर ठरला.

संबधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : बर्न्सच्या अर्धशतकी खेळीने कांगारूचा भारतावर ८ विकेट्सने विजय; १-० ने घेतली आघाडी
– टीम इंडियाचा लाजीरवाणा पराक्रम आणि माजी खेळाडूंच्या तिखट प्रतिक्रिया, चाहत्यांकडूनही मीम्सचा भडीमार
– अब जिंदा रेहने के लिये बचा ही क्या है! टीम इंडियाच्या वाईट प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---