गुरुवारी, 2 आॅगस्टला चीनमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत तिसरी फेरी पार पडली. या फेरीत भारताचे सायना नेहवाल, पीव्ही सिंधू आणि साईप्रणीत यांनी एकेरीत उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला आहे.
तसेच भारताचा स्टार बॅटमिंटनपटू किदंबी श्रीकांतला पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे त्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
सायनाने 2013 च्या विजेत्या थायलंडच्या रचॉनोक इंटॅनॉनला 47 मिनिटात 21-16 21-19 अशा फरकाने सरळ सेटमध्ये पराभूत केले. तिचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना दोन वेळच्या विजेत्या कॅरेलिना मरिनशी होणार आहे.
तसेच सिंधूने कोरियाच्या सुंग जी ह्युनचा 21-10,21-18 अशा फरकाने पराभव केला. पहिला सेट सिंधूने सहज जिंकला होता. मात्र दुसऱ्या सेटमध्ये सिंधू सुरुवातीला पिछाडीवर पडली होती. पण तीने नंतर पुनरागमन करत दुसरा सेट जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पुरुष एकेरीत साईप्रणीतने डेन्मार्कच्या हान्स क्रिस्टीयन सोलबर्ग विट्टीनघुसला पराभवाचा धक्का दिला आहे. त्याला 39 मिनिटे चाललेल्या या लढतीत विट्टीनघुसविरुद्ध जास्त संघर्ष करावा लागला नाही. त्याने सरळ दोन सेटमध्ये विट्टीनघुसचा 21-13,21-11 अशा फरकाने पराभव केला.
मात्र पुरुष एकेरीत पाचव्या मानांकीत श्रीकांतला डॅरेन लीउने 21-18,21-18 अशा फराकाने सरळ सेटमध्ये पराभूत केले. पहिला सेट गमावल्यानंतर श्रीकांतने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता. पण श्रीकांत 18-16 असा दुसऱ्या सेटमध्ये आघाडीवर असताना डॅरेनने सलग 5 पॉइंट मिळवत सामनाही जिंकला.
मिश्र दुहेरीत भारताची जोडी उपांत्यपूर्व फेरीत-
स्वस्तिकराज रांकारेड्डी-अश्विनी पोनप्पा या भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीने मलेशियाच्या गोह सून हॉत – शेव्हन जेमी लाय या जोडीचा 20-22, 21-14, 21-6 अशा फरकाने पराभव केला आहे.
59 मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिला सेट अटातटीचा झाला. तर दुसऱ्या सेटमध्ये मलेशियाच्या जोडीने आघाडी घेतली होती पण भारताच्या जोडीने खेळ उंचावत 9-9 अशी बरोबरी साधली आणि नंतर हा सेटही जिंकत सामना बरोबरीचा केला.
त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये भारतीय जोडीने आक्रमक खेळ करत आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत रांकारेड्डी-पोनप्पा 11-4 अशा आघाडीवर होते. त्यानंतरही त्यांनी गोह सून हॉत – शेव्हन जेमी लायला कोणतीही संधी न देता सामन्यावरही पकड मिळवली.
उद्या (3 आॅगस्ट) भारतीय खेळाडूंचे असे होतील सामने-
एकेरी सामने-
पीव्ही सिंधू विरुद्ध नोझोमी ओकुहारा (जपान)
साई प्रणीत विरुद्ध केन्टो मोमोटा (जपान)
सायना नेहवाल विरुद्ध कॅरेलिना मरिन (स्पेन)
मिश्र दुहेरी-
स्वस्तिकराज रांकारेड्डी-अश्विनी पोनप्पा विरुद्ध झेंग सिवेइ- हूंग यिकिओन्ग (चीन)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट, जो रुट नव्हे तर केएल राहुलच जगातील सर्वोत्तम फलंदाज
–कार्तिकने आश्विनला दिले आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज गोलंदाजाचे नाव