मागीलवर्षी टोकियो ऑलिंपिक एकवर्षाने पुढे ढकलण्यात आले होते. आता ही ऑलिंपिक स्पर्धा यावर्षी जुलै-ऑगस्टदरम्यान खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, एक मोठे वृत्त समोर येत आहे की भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत हे ऑलिंपिक २०२१ साठी पात्र ठरलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर या मोठ्या जागतिक स्पर्धेला मुकावे लागण्याची नामुष्की ओढावली आहे.
बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने जाहीर केल्याप्रमाणे पात्र ठरण्याची अंतिम तारिख १५ जून असून त्यापूर्वी कोणतीही पात्रता स्पर्धा होणार नाही. त्यामुळे नेहवाल आणि किदांबी श्रीकांतला मोठा फटका बसला आहे.
बॅडमिंटन वर्ल्ड फेडेरेशनने सांगितले आहे की ‘टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्यासाठी कोणत्याही स्पर्धा यापुढे खेळवण्यात येणार नाही. पात्र ठरण्याची अंतिम तारिख अधिकृतरित्या १५ जून २०२१ आहे. तसेच टोकियो ऑलिपिंकसाठी शर्यतीतील क्रमवारीत आता कोणताही बदल होणार आहे. त्याचबरोबर अंतिम सहभागी होणाऱ्या खेळाडूंची यादी लवकरच पाठवण्यात येईल.’
नियमाप्रमाणे ऑलिंपिकसाठी क्रमवारीत पहिल्या १६ क्रमांकामध्ये असणारे बॅडमिंटनपटू पात्र ठरतात. पण नेहवाल सध्या २२ व्या क्रमांकावर आहे, तर किदांबी २० व्या क्रमांकावर आहे. तसेच आता क्रमवारीत कोणताही बदल होणार नसल्याने आता त्यांच्या टोकियो ऑलिंपिक खेळण्याच्या आशा मावळल्या आहेत. नेहवालला मागील काही महिन्यांत झालेल्या दुखापतींचा फटका बसला आहे. तसेच नेहवाल आणि किदांबी या दोघांनाही मागील काही स्पर्धा कोरोनामुळे रद्द झाल्यानेही नुकसान झाले आहे. त्यातच सिंगापूर ओपन ही अखेरची पात्रता फेरीही रद्द झाली.
विशेष म्हणजे नेहवाल भारताची ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी पहिली बॅडमिंटनपटू आहे. तिने २०१२ साली कांस्यपजक जिंकले होते. तर किदांबी श्रीकांतने २०१६ साली ऑलिंपिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.
भारताचे ४ बॅडमिंटनपटू पात्र
नेहवाल आणि किदांबीला जरी टोकियो ऑलिंपिकला मुकावे लागले असले तरी भारताचे ४ बॅडमिंटनपटू या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. यात पीव्ही सिंधू आणि साई प्रणित हे दोघे एकेरी गटात पात्र ठरले आहेत तर चिराग शेट्टी आणि चिराग शेट्टी हे दुहेरी गटात पात्र ठरले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कमालीची डेरिंग! ‘असे’ ५ करारबद्ध क्रिकेटपटू, ज्यांनी त्यांच्याच बोर्डाशी घेतली पंगा
स्टुअर्ट ब्रॉडच्या होणाऱ्या नवरीची मोठी इच्छा; म्हणे, ‘मोठं कुटुंब पाहिजे, मुलं घरभर फिरतील’
पृथ्वी शॉ पाठोपाठ आता केकेआरच्या राहुल त्रिपाठीवरही पुण्यात पोलिसांचा कारवाईचा बडगा