ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणाऱ्या सायना नेहवालने (Saina Nehwal) भारतातील खेळांच्या स्थितीवर मोठे विधान केले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर सायना व्यक्त झाली. टोकियो येथे झालेल्या 2021 ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने 7 पदके जिंकली होती. मात्र, पॅरिसमध्ये हा आकडा गाठण्याची शक्यता कमी आहे. या निराशाजनक कामगिरीनंतर सायना नेहवालची खंत समोर आली आहे.
सायना नेहवाल अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये दिसली. त्यात तिला पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी आणि देशातील खेळांची स्थिती याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. सायना म्हणाली की, “आपल्या देशात फक्त क्रिकेटलाच प्राधान्य दिले जाते इतर खेळांना क्रिकेटपटूंसारख्या सुविधा किंवा आर्थिक सुरक्षा मिळत नाही. क्रिकेटप्रमाणे इतर खेळांनाही देशात सुविधा मिळाल्या, तर ऑलिम्पिकमधील आमची कामगिरीही सुधारेल आणि चीन, अमेरिकेप्रमाणे पदके जिंकण्यातही आम्ही यशस्वी होऊ.”
भारतीय संघाला आतापर्यंत यावर्षी केवळ चार पदके जिंकता आली आहेत. मनू भाकेर हिने महिला नेमबाजीत एक कांस्य व सरबजोत सिंगसह मिश्र प्रकारात कांस्य जिंकले. तर, स्वप्निल कुसळे यानेही नेमबाजीतच कांस्य आपल्या नावे केले आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा रौप्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरला. तर, तब्बल ७ खेळाडू चौथ्या क्रमांकावर राहिले.
ऑलिम्पिकमध्ये असे अनेक खेळ आहेत जिथे भारताचा सहभाग नसतो. चीन आणि अमेरिकेतील 300 हून अधिक खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असताना, यावेळी भारतातून केवळ 117 खेळाडू गेले आहेत. क्रिकेट वगळता देशातील इतर खेळांची स्थिती चांगली नसल्याचा हा पुरावा आहे. देशातील इतर खेळांचा दर्जा बळकट करण्यासाठी सरकारने पुढे येऊन खेळाडूंना मदत करण्याबरोबरच त्यांना सुरक्षित भविष्यही द्यावे लागेल, तरच ते ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकतील, असे मत व्यक्त केले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भाला कशापासून बनतो? भालाफेकीचा इतिहास काय? रंजक माहिती जाणून घ्या
विनेशसाठी धावून आला सचिन तेंडूलकर; गणित समजावत म्हणाला, “तिला रौप्य पदक…”
नीरज चोप्राच्या आईनं केलेल्या वक्तव्यावर कुस्तीपटू बजरंग पुनिया भावूक! म्हणाला…