आयपीएल 2020 च्या 49 व्या सामन्यात चेन्नई सूपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडी राखून पराभव केला. या अटीतटीच्या सामन्यात चेन्नईचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने मोलाची कामगिरी बजावली. डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने संघाला विजय मिळवून दिला. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षीनेही त्याचे कौतुक केले आहे.
साक्षी धोनीने केलं कौतुक
जडेजाच्या खेळीने प्रभावित होऊन चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षीने त्याचे कौतुक केले आहे. तिने इंस्टाग्राम पोस्टमध्ये जडेजाचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, “बाब रे बाप जडेजा.”
कोलकाताने केल्या 172 धावा
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 172 धावा केल्या. कोलकाताचा सलामीवीर नितीश राणाने 61 चेंडूत 87 धावांची आक्रमक खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त कोलकाताच्या कोणत्याही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही.
चेन्नईचा संघ होता अडचणीत
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईची सुरुवात चांगली झाली.सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि शेन वॉटसन यांनी पहिल्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. अनुभवी खेळाडू अंबाती रायडू (38 धावा) यानेही महत्वपूर्ण कामगिरी केली. मात्र, ऋतुराज बाद झाल्यानंतर संघ अडचणीत आला. संघाला विजयासाठी 16 चेंडूत 33 धावांची गरज होती.
जडेजाने षटकार मारत मिळवून दिला विजय
शेवटच्या षटकात विजयासाठी 10 धावांची गरज होती. कोलकाताचा युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी शेवटचे षटक फेकायला आला. त्याने पहिल्या चार चेंडूवर फक्त 3 धावा दिल्या. शेवटच्या दोन चेंडूंवर 7 धावांची गरज होती. जडेजाने दोन चेंडूंवर सलग दोन षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याने 11 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
वैर फक्त मैदानावर! धोनीची दांडी उडवल्यानंतर त्याच्याकडूनच टिप्स घ्यायला गेला चक्रवर्ती, पाहा Video
CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम
‘पुढच्या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा करू शकतो का?’ या प्रश्नावर मॅक्सवेलने दिलं भन्नाट उत्तर
ट्रेंडिंग लेख –
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…
भारताचा ‘तो’ एक दौरा केला नसता तर क्रिकेटला ‘हेडन’ मिळाला नसता…