भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीपटू व भाजप नेत्या बबिता फोगटवर मोठा आरोप केला आहे. साक्षी मलिकने खुलासा केला आहे की, काँग्रेस नव्हे तर बबिता फोगटने कुस्तीपटूंना भाजप नेते व कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करण्यास प्रवृत्त केले होते. तसेच विनेश फोगटने गृहमंत्री अमित शहा यांना महासंघातील शोषणाबाबत सर्व काही सांगितले होते, तरीही काहीही झाले नाही. त्यामुळे आम्हाला आंदोलने करावी लागली, असेही साक्षी मलिकने असेही सांगितले आहे.
खरं तर, ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान साक्षी मलिकला विचारण्यात आले की, काँग्रेसने विरोधासाठी कुस्तीपटूंना पुढे केले, असा आरोप अनेकदा केला जात होता. त्यावर साक्षी म्हणाली की, “हरियाणा भाजपच्या दोन नेत्यांनी आम्हाला आंदोलनासाठी परवानगी दिली होती, ते म्हणजे बबिता फोगट आणि तीर्थ राणा. बबिता फोगटने आमच्याशी संपर्क साधला होता कारण तिला बृजभूषण शरण सिंगचे पद मिळवण्याची लालूच होती.”
साक्षी मलिक पुढे म्हणाली की, “बबिता फोगटला हे पद मिळाल्यास काहीतरी चांगलं घडेल असं आम्हालाही वाटत होतं, पण ती आमच्यासोबत एवढा मोठा खेळ करेल हे आम्हाला माहीत नव्हतं. आम्हाला खात्री होती की बबिता फोगट देखील आमच्यासह आंदोलनात सामील होईल आणि एक खेळाडू असल्याने ती खेळत असताना या सर्व गोष्टी घडल्या आहेत यावर ती आवाज उठवेल. परंतचु तसे झाले नाही.” या आंदोलनानामागे काँग्रेस नसल्याचे यावेळी साक्षीने यांनी स्पष्ट केले.
‘विनेश फोगटने स्वतःला सिद्ध केले’
साक्षी मलिक पुढे म्हणाली की, “या खेळाडूंचे करिअर आता संपले आहे, असे अनेक आरोप केले गेले. विनेश फोगटने यापैकी एक सिद्ध केले, ती पुन्हा ऑलिम्पिकपर्यंत खेळायला गेली. ती संपली असते तर तिला कोणीही ऑलिम्पिकला जाऊ दिले नसते. त्यामुळे या लोकांना संपवल्याचे ब्रिजभूषण शरण सिंह यांचे विधान खोटे ठरले, त्यामुळे निषेध करण्यात आला. आम्ही थेट विरोध सुरू केला नव्हता, तर विनेश फोगटने सर्वप्रथम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण समस्या सांगितली होती. त्यानंतर कोणताही प्रतिसाद न आल्याने आम्ही आंदोलनाचा मार्ग निवडला होता.”
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅर्डर गावसकर मालिका खेळणार वाॅर्नर? म्हणाला, “मी मागे हटणार…”
IND vs NZ; पुण्यातील खेळपट्टी कशी असणार? फिरकीपटूंना मिळणार मदत?
टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संधी न मिळण्याबाबत काय म्हणाला संजू सॅमसन?