भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी खेळणाऱ्या खेळाडूलाही तितकाच पैसा मिळत असतो. तसे तर, भारतीय क्रिकेटपटूंच्या कमाईविषयी जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. त्यातही भारतीय संघाचा सलामीवीर आणि आयपीएलच्या सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याच्या कमाईची माहिती अनेकांना जाणून घ्यावीशी वाटते.
भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा याचा समावेश कोट्यावधी रुपये कमावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत केला जातो. माध्यमांतील वृत्तांनुसार, एक भारतीय नागरिक वर्षाला जितकी कमाई करतो. तितकीच कमाई रोहित शर्मा अवघ्या ६ तासांत करतो. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, वार्षिक उत्पन्नाच्या बाबतीत भारत १०६ देशांच्या यादीत ७२ व्या क्रमकांवर आहे. भारतात सरासरी एका महिन्याचे उत्पन्न ३२,८०० रुपये इतके आहे. तसेच वार्षिक उत्पन्न ३,९४,००० इतके आहे.
कोट्यावधींचा मालक आहे रोहित शर्मा
फोर्ब्सच्या अहवालानुसार, रोहितचे वार्षिक उत्पन्न एकूण ५४.२९ कोटी रुपये इतके आहे. रोहित शर्मा हा बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीतील ए+ श्रेणीतील खेळाडू आहे. यानुसार त्याला वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात. तर मुंबई इंडियन्स संघाकडून त्याला १५ कोटी रुपये मिळतात. यासोबतच अनेक बड्या कंपन्यांचा तो ब्रँड ॲम्बेसेडर देखील आहे. त्यामुळे जाहिरातीतून देखील तो कोट्यावधींची कमाई करतो.
यावरून तुम्ही जर रोहित शर्मा आणि एका भारतीय नागरिकाच्या कमाईची तुलना केली; तर जाणवेल की एक भारतीय नागरिक जितकी कमाई वर्षभरात करतो तितकीच कमाई रोहित शर्मा अवघ्या ६ तासांमध्ये करतो.
रोहित शर्मा आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या सामन्यात संघाला आणि चाहत्यांना त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ओहो! आपल्या बायोग्राफीमध्ये ‘या’ अभिनेत्याने साकारावी भूमिका, तर हिरोईन असावी कॅटरिना; चहलची इच्छा
असं कोण रेनकोट घालतं! लॉर्ड्स कसोटीत दर्शकाची भलतीच कृती, दर्शकांसह समालोचकही लोटपोट
कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्यापुर्वी ‘फॉलोऑन’ नियमाबाबत आयसीसीची मोठी घोषणा, वाचा सविस्तर