भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय हे सध्या क्रिकेटजगतात सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून प्रसिद्ध आहे. इतर देशांच्या खेळाडूंच्या तुलनेत भारतीय क्रिकेटपटू जास्त श्रीमंत असतात. मात्र, एक काळ असा होता ज्यावेळी बीसीसीआयकडे खेळाडूंना पूरेल इतका पगार देण्याइतकेही पैसे न्हवते. ऐकूण खोटं वाटेल पण ही गोष्ट खरी आहे. आणि हे सिद्ध करण्याचा दाखला म्हणजे १९८३ साली पहिल्यांदा भारतासाठी विश्वचषक जिंकणाऱ्या खेळाडूंचा पगार. कपिल देव यांच्या नेतृत्वात खेळलेल्या संघातील खेळाडूंना किती मानधन मिळत होते हे आज आपण पाहणार आहोत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयची एकूण संपत्ती १४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. १९८३ च्या विश्वचषकादरम्यान, प्रत्येक बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला (संघ व्यवस्थापकासह) १५०० रुपये मॅच फी, २०० रुपये प्रतिदिन तीन दिवसांसाठी दैनिक भत्ता म्हणून दिले. एकूण, प्रत्येक खेळाडू आणि व्यवस्थापकाला २१०० रुपये मिळायचे. याउलट भारतीय खेळाडू आता करोडोंमध्ये कमावतात. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दरवर्षी ७ कोटी रुपये कमावतो आणि त्यात आयपीएलमधून कमावलेल्या पैशांचा समावेश नाही. त्यानंतर, रणजी करंडक खेळाडू चार दिवसीय खेळांमध्ये दररोज ३५हजार रुपयांपेक्षा जास्त कमावतात. याचा विचार करता १९८३ मध्ये संपूर्ण टीमला केवळ 29,400 रुपये मानधन देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, २५ जून १९८३ रोजी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने विंडीजविरुद्ध ट्रॉफी जिंकून जगाला चकित केले. प्रवासाच्या आशेने तो विश्वचषक खेळण्यासाठी इंग्लंडला गेल्याचे अनेक खेळाडूंनी मान्य केले होते. पण संघाचा कर्णधार कपिल देवच्या हार न मानण्याच्या भावनेने भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, जिंकल्यानंतर संघातील प्रत्येक खेळाडूला १ लाख रुपयांचे बक्षिस देण्यासाठी सुद्धा बीसीसीआयतर्फे लता मंगेशकर यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याची गरज भासली होती, असे सांगण्यात येते. त्यामुळे त्यावेळच्या तुलनेत भारतीय क्रिकेट बोर्ड सध्या खूप श्रीमंत असल्याचे जाणवते. म्हणूनच पाकिस्तान क्रिकेटबोर्डासह जगातील इतर देशही आपल्या खेळाडूंना भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणे जीवन देता यावे यासाठई प्रयत्नशील असतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बेन स्टोक्सने इंग्लंडच्या प्रशिक्षकाचाच विक्रम काढला मोडीत, पूर्ण केले कसोटीतील षटकारांचे ‘शतक’
रजत पाटीदारने वाढवले मुंबईचे टेंशन, धडाकेबाज शतक ठोकत संघाला आणले मजबूत स्थितीत
SL vs AUS: ऑस्ट्रेलियाची विजयी अखेर, मात्र मालिका नावावर करत श्रीलंकेने रचला इतिहास