चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील यजमान संघ पाकिस्तान एकही सामना न जिंकता स्पर्धेच्या बाहेर पडला. आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या समारोपानंतर पाकिस्तान संघाला न्यूझीलंड विरुद्ध टी20 मालिका खेळायची आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाच्या कर्णधारपदी सलमान आगाची नियुक्ती केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 संघातून बाबर आजम आणि मोहम्मद रिजवानला वगळण्यात आले आहे. तसेच निवडकर्त्यांनी दोन्ही फॉरमॅटमध्ये आताही शाहीन शाह आफ्रिदी वर विश्वास दाखवला आहे.
आता पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक जावेद आकिब यांनी लाहोर मध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन सलमान आगाला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. तसेच टी20 संघातून मोहम्मद रिजवान आणि बाबर आजम दोघांनाही बाहेर केले आहे. जावेद आकीब यांनी सांगितले की संघ व्यवस्थापन युवा खेळाडूंना संधी देऊ इच्छितो. तसेच टी20 संघाच्या यादीमधून नसीम शहा आणि मोहम्मद हसनैन यांना देखील वगळण्यात आले आहे.
न्यूझीलंड संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळत आहे. त्यांचा 5 मार्च रोजी उपांत्य फेरीतील सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात टी20 मालिका 16 मार्चपासून सुरू होणार आहे. तसेच 26 मार्चपर्यंत दोन्ही संघात 5 टी20 सामने खेळले जाणार आहेत. त्या मालिकेनंतर दोन्ही संघात तीन वनडे सामन्यांची मालिका देखील खेळली जाणार आहे. पाकिस्तान संघ 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा यजमान असून सुद्धा एकही सामना जिंकू शकला नाही आणि साखळी सामन्यादरम्यानच तो स्पर्धेच्या बाहेर पडला.
पाकिस्तान संघाचे टी20 स्क्वाड: सलमान अली आगा (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, हारिस रऊफ, हसन नवाज, जहांदाद खान, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद अली, मोहम्मद हारिस, मुहम्मद इरफान खान, ओमैर बिन यूसुफ, शाहीन शाह अफरीदी, सुफयान मुकीम, उस्मान खान.
हेही वाचा
IND vs AUS; भारतीय खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी का बांधली? कारण भावूक करणारं
क्रिकेटमध्ये असं दुर्भाग्य कुणाचंच नसेल! रोहितच्या नावावर नकोसा विक्रम
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यापूर्वी भारताच्या विजयासाठी वाराणसीत हवन, काशीच्या घाटांवर महाआरती






