आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. ही स्पर्धा झाल्यानंतर विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माची टी२० संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. बुधवारी (८ डिसेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कसोटी मालिकेसाठी (बीसीसीआय) १८ सदस्यीय खेळाडूंची घोषणा केली आहे. तर आणखी एक मोठा निर्णय घेत, विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकले आहे. तर, रोहित शर्माला वनडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले. या निर्णयानंतर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू सलमान बटने मोठे वक्तव्य केले आहे.
सलमान बट्टने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढल्यामुळे मला मुळीच आश्चर्य वाटले नाही. जर रोहित शर्माला फक्त टी२० संघाचे कर्णधारपद दिले असते तर ते चुकीचे असते. कारण, मर्यादित षटकांचा कर्णधार कोणीतरी एकच हवा. बोर्डने घेतलेल्या या निर्णयामुळे विराटवरील दबाव कमी होईल. तसेही भारतीय संघ टी२० चे जास्त सामने खेळत नाही. त्यामुळे रोहित शर्माला ही जबाबदारी मिळणारच होती.”
तसेच बीसीसीआयने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही कालावधीपासून अजिंक्य रहाणेला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. तो कसोटी संघाचा कर्णधार होता. परंतु, दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी त्याला उपकर्णधार पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या ऐवजी रोहित शर्माला उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर विराट कोहली कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
विराट कोहलीची वनडे संघाचा कर्णधार म्हणून कारकीर्द
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९ पैकी १५ मालिकांमध्ये विजय मिळवला होता. यापैकी मायदेशात त्याने ९ पैकी ८ मालिका आपल्या नावावर केल्या. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन २-१ वनडे मालिकेत विजय मिळवला. तर दक्षिण आफ्रिकेत ५-१, वेस्ट इंडीजमध्ये ३-१ ने विजय मिळवला. तसेच न्यूझीलंड, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि बांगलादेशमध्ये जाऊन देखील विराट कोहलीने भारतीय संघाला विजय मिळवून दिले.
महत्वाच्या बातम्या :
हार्दिकने दिले अकाली निवृत्तीचे संकेत; ‘या’ कारणाने घेऊ शकतो निर्णय
अरे काय चाललंय! बलाढ्य इंग्लंड संघाचे ऍशेसमध्ये लज्जास्पद प्रदर्शन, ६ फलंदाज एकेरी धावेवर बाद
विराट कोहलीने शेअर केला ‘८०च्या दशकातील मुलां’चा फोटो; लिहिले, ‘एकेकाळची गोष्ट आहे…