आयपीएल २०२२मध्ये अनेक नव्या खेळाडूंनी सर्वांना प्रभावित केले आहे. मात्र, यातील विशेष लक्षवेधी ठरला तो म्हणजे सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक. उमरानने यंदाच्या आयपीएल हंगामात सातत्याने १५० पेक्षा जास्त वेगाने गोलंदाज केली आहे. त्याच्या सातत्यामुळेच त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी संघात निवडण्यात आले. त्याच्या गोलंदाजीच्या वेगामुळे त्याची तुलना पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरसोबत केली जात आहे. यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने मोठे विधान केले आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने (Salman Butt) शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि उमरान मलिक (Umran Malik) यांच्यातील तुलना नाकारून म्हटले आहे की, “भारतीय वेगवान गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजून बराच पल्ला गाठायचा आहे. त्याला अजून आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे इतक्यात त्याची तुलना शोएब अख्तरसोबत करणे योग्य ठरणार नाही. ”
आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर बोलताना सलमान बट म्हणाला की, “मला माहित नाही की उमरानला का थांबवले जात आहे. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) हा अनुभवी गोलंदाज आहे. इतर वरिष्ठ खेळाडूंसह भारत त्याला विश्रांती देऊ शकला असता. भारत उमरानला संधी देण्याचा प्रयत्न करू शकला असता. उमरान इतर गोलंदाजांपेक्षा वेगळा आहे. तो वेगवान गोलंदाजी करतो आणि तो वेगळ्या रंगात दिसतो. त्यामुळे त्याला संघात लवकरात लवकर स्थान मिळावे अशी माझी इच्छा आहे.”
दरम्यान, उमरानने यंदाच्या आयपीएलमध्ये ताशी १५७ किमीच्या वेगाने चेंडू टाकला होता. त्यानंतर उमरान लवकरच शोएब अख्तरच्या वेगवान चेंडूचा विक्रम मोडीत काढेल अश्या चर्चांना उधानं आले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यापूर्वीच्या सराव सत्रात उमरानने ताशी १६३.७ किमीच्या वेगाने चेंडू टाकला असल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायल झाले होते. मात्र, याला बीसीसीआय अथवा संघातील कोणत्याही खेळाडूने दुजोरा दिलेला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
गडी काय थांबना!, आयपीएल संपल्यानंतर अश्विन करतोय इंग्लंडविरुद्धच्या कसोटीची विशेष तयारी
दुसऱ्या सामन्यासाठी Cuttack शहरात पोहोचताच भारतासह दक्षिण आफ्रिकी खेळाडूंचे जंगी स्वागत, Video Viral
…म्हणून इशान किशन होता IPL 2022चा महागडा खेळाडू, बलाढ्य आयपीएल संघाच्या मेंटॉरनेच सांगितले कारण