इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्या दरम्यानचा दुसरा वनडे सामना लंडन येथील ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ९ बाद २४१ धावा धावफलकावर लावल्या. या सामन्यात इंग्लंडसाठी युवा अष्टपैलू सॅम करनने पाच बळी मिळवून श्रीलंकेच्या डावाची वाताहत केली. यादरम्यान त्याने आपला मोठा भाऊ टॉम करनप्रमाणे एक विक्रम नोंदविला.
करनने केली कमाल
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने शानदार सुरुवात केली. युवा अष्टपैलू सॅम करनने चौथ्या षटकातच श्रीलंकेचे आघाडीचे तीन गडी अवघ्या १२ धावा देऊन बाद केले. त्यानंतर वनिंदू हसरंगा व चमिका करूणारत्ने यांना बाद करत ४८ धावा देत वनडे कारकिर्दीतील पहिले बळींचे पंचक पूर्ण केले. त्याला डेविड विलीने चार बळी घेत सुयोग्य साथ दिली.
मोठ्या भावाप्रमाणेच केली कामगिरी
सॅम करन इंग्लंडसाठी वनडे सामन्यात पाच बळी मिळवणारा पाचवा युवा गोलंदाज ठरला. सॅम सध्या २३ वर्ष २८ दिवस इतक्या वयाचा आहे. इंग्लंडसाठी वनडे क्रिकेटमध्ये पाच बळी घेणारा चौथा सर्वात तरुण गोलंदाज म्हणून सॅम करनचा मोठा भाऊ टॉम करन याची नोंद आहे. त्याने २८ जानेवारी २०१८ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थ येथे २२ वर्ष ३२२ दिवस इतके वय असताना ३५ धावा देत ५ बळी मिळवले होते.
ओव्हलवर अशी कामगिरी करणारा चौथा गोलंदाज
सॅम करनने श्रीलंकेविरुद्ध पाच बळी मिळवताना ओव्हलच्या मैदानावर अशी कामगिरी करणारा इंग्लंडचा चौथा गोलंदाज होण्याचा मान मिळवला. त्याच्यापूर्वी रॉनी इराणी, माईक हेन्ड्रीक व समित पटेल यांनी ओव्हलच्या मैदानावर पाच बळी मिळवले होते. विशेष म्हणजे हे सर्व खेळाडू अष्टपैलू म्हणून इंग्लंड संघात खेळत असत.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटवर कुबेराची कृपा! एका इंस्टाग्राम पोस्टसाठी मिळतात ‘इतके’ कोटी रुपये
‘पंतचा तो झेल सोडणे पडले असते महागात, त्यावेळी विचार आला की…’ टीम साऊदीने व्यक्त केल्या भावना






