पुणे, 11 ऑक्टोबर 2023: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी व सोलींको प्रायोजित पीएमडीटीए मानांकन प्रेसिडेन्सी ज्युनियर ब्रॉन्झ सिरिज 2023 स्पर्धेत समायरा ठाकूर हिने ८ व १० वर्षांखालील दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, मुलांच्या गटात वेदांत अगरवाल, हर्ष नागवानी यांनी विजेतेपद पटकावले.
विमाननगर येथील प्रेसिडेन्सी फेडल टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत ८ वर्षांखालील मुलींच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित समायरा ठाकूर हिने दुसऱ्या मानांकित प्रग्या जैनचा ७-१ असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. तर, मुलांच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित वेदांत अगरवालने दुसऱ्या मानांकित प्रयाण ढगेचा ७-२ असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.
१० वर्षांखालील मुलींच्या गटात अंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित समायरा ठाकूरने अव्वल मानांकित झिया सैफीचा टायब्रेकमध्ये ६-५(२) असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. मुलांच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित हर्ष नागवानीने अव्वल मानांकित रिषभ एचा ७-५ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण उद्योजक राजेश मंकणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक रवी देवराकोंडा, अमोल कांबळे, आदित्य कोळी, सचिन वडगा आणि स्पर्धा निरीक्षक प्रणव वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
८ वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
वेदांत अगरवाल(३) वि.वि.कियान पेंडुरकर(६) ६-०;
प्रयाण ढगे(२) वि.वि.केशवदित्य सिंग ६-२;
अंतिम फेरी: वेदांत अगरवाल(३) वि.वि.प्रयाण ढगे(२) ७-२;
८ वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
समायरा ठाकूर(१) वि.वि.अदिरा भगत(३) ६-३;
प्रग्या जैन(२)वि.वि.आराध्या पवार(४) ६-१;
अंतिम फेरी: समायरा ठाकूर(१) वि.वि.प्रग्या जैन(२) ७-१;
१० वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
झिया सैफी(१) वि.वि. ईशना नायडू(३) ६-०;
समायरा ठाकूर(२) वि.वि.खुशी नागपुरे(७) ६-१;
अंतिम फेरी: समायरा ठाकूर(२) वि.वि.झिया सैफी(१) ६-५(२);
१० वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
रिषभ ए(१) वि.वि.ओजस पवार(३) ६-२;
हर्ष नागवानी(२) वि.वि.अहान भट्टाचार्य ६-५(३);
अंतिम फेरी: हर्ष नागवानी(२) वि.वि.रिषभ ए(१) ७-५.
महत्वाच्या बातम्या –
तूच खरा हिरो! आधी स्मिथ अन् आता नवीनसाठी उभा ठाकला विराट, दाखवली असामान्य खिलाडूवृत्ती
टीम इंडिया मिशन पाकिस्तान जिंकण्यासाठी तयार! रोहित म्हणाला, ‘या गोष्टींना महत्व देत नाही’