कर्नाटकातील महाराजा टी20 लीगचा 19 वा सामना गुलबर्गा मिस्टिक्स आणि म्हैसूर वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात देवदत्त पडिक्कलच्या नेतृत्वाखालील गुलबर्गा मिस्टिक्स संघाने करुण नायरच्या नेतृत्वाखालील म्हैसूर वॉरियर्सचा 5 विकेट्स राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना म्हैसूर वॉरियर्सने 20 षटकांत 9 गडी गमावून 154 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुलबर्गाने हे लक्ष्य 18.5 षटकांत 5 विकेट्स गमावून पूर्ण केले.
गुलबर्ग्याचा कर्णधार देवदत्त पडिक्कलने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, जो अगदी योग्य ठरला. प्रथम फलंदाजीला आलेल्या म्हैसूर वॉरियर्सची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या 23 धावांवर संघाला दोन मोठे धक्के बसले. उत्कृष्ट फॉर्मात असलेला कर्णधार करुण नायर या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला आणि खातेही न उघडताच बाद झाला. याशिवाय राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडही या सामन्यात फ्लॉप ठरला. समितला 9 चेंडूत केवळ 12 धावा करता आल्या. संघाची मधली फळी पूर्णपणे फ्लॉप ठरली.
खालच्या फळीत मनोज भांडगेने 14 चेंडूत 38 धावांची तुफानी खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. जगदीशन सुचितनेही 22 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या. गुलबर्गातर्फे अभिषेक प्रभाकरने 4 षटकात केवळ 21 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.
देवदत्त पडिक्कलने 21 चेंडूत 24 धावांची खेळी केली
लक्ष्याचा पाठलाग करताना गुलबर्ग्याची सुरुवात चांगली झाली. लवनीथ सिसोदिया आणि कर्णधार देवदत्त पडिक्कल यांनी पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. सिसोदियाने 16 चेंडूत 23 धावा केल्या तर पडिक्कलने 21 चेंडूत 24 धावांची खेळी केली. यानंतर आर स्मरणने 36 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 56 धावा केल्या तर रितेश भटकळने 16 चेंडूत 22 धावा करत संघाला विजयाकडे नेले. मनोज भांडगे यानेही आपल्या संघाकडून गोलंदाजीत चांगली कामगिरी करत 2 फलंदाज बाद केले, मात्र त्याला इतर गोलंदाजांची साथ लाभली नाही. या कारणामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या-
शिखर धवनप्रमाणेच ‘या’ 5 भारतीय खेळाडूंनाही फेअरवेल मॅच खेळण्याची मिळाली नाही संधी
बांगलादेशच्या फलंदाजाची विकेट घेतल्यानंतर ‘बापमाणूस’ बनलेल्या आफ्रिदीचे खास सेलिब्रेशन – Video
“रिकाम्या हातानं आलो, रिकाम्या हातानं जाणार”, निवृत्तीनंतर शिखर धवनची पहिली प्रतिक्रिया