ट्रान्सफर विडोंमध्ये एका इटालियन क्लबने रोनाल्डोला करारबद्ध केले आहे. रोनाल्डो विएरा असे या फुटबॉलपटूचे नाव असून त्याला यु सी सॅम्पडोरीया या इटालियन क्लबने 6.2 मिलियन युरोत पाच वर्षासाठी करारबद्ध केले आहे.
यावेळी सॅम्पडोरीया इंग्लिशने ट्विटरवर जुवेंट्सने केलेल्या क्रिस्तीयानो रोनाल्डोच्या शैलीतच विएराची घोषणा केली.
BREAKING: #Sampdoria sign #Ronaldo! pic.twitter.com/vTZafVkMBF
— Sampdoria English (@sampdoria_en) August 3, 2018
.@Cristiano https://t.co/vzGBI3d8kh #CR7JUVE pic.twitter.com/UB7BwBdDWe
— JuventusFC 🇬🇧🇺🇸 (@juventusfcen) July 10, 2018
मिडफिल्डर विएरा हा याआधी लीड्स युनायटेड क्लबकडून खेळत होता. तसेच लीड्सने त्याला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या असून विएरानेही त्यांचे आणि चाहत्यांचे ट्विटरवरून आभार मानले आहेत. तसेच लीड्सकडून तो 60 सामने खेळला आहे.
📰 | Ronaldo Vieira completes move to Sampdoria. Good luck Ronaldo pic.twitter.com/HPegs5vrOA
— Leeds United (@LUFC) August 1, 2018
गिनी बिसाऊ येथे जन्मलेल्या 20 वर्षीय विएरा 2011मध्ये पोर्तुगलमधून इंग्लंडमध्ये स्थायिक झाला. विएरा हा पाचवा इंग्लिश खेळाडू आहे ज्याला इटालियन क्लबने संघात घेतले.
त्याच्या आधी ट्रेवर फ्रांसिस, डेव्हिड प्लाट, डेस वॉल्कर, ली शार्पे या फुटबॉलपटूंना इटालियन क्लबने करारबद्ध केले आहेत.
तसेच सेरी ए या इटालियन स्पर्धेत जुवेंट्स आणि सॅम्पडोरीया यांच्यात 29 डिसेंबर 2018 आणि 26 मे 2019मध्ये सामने होणार आहेत.
जुवेंट्सने या स्पर्धेचे सर्वाधिक असे 34 विजेतेपद जिंकले असून सलग 8 विजेतेपद जिंकले आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–या कारणामुळे विराटचे नाव आज दिग्गजांच्या यादीत सामील होणार
–झ्लाटनने दिले टिकाकरांना चोख प्रत्युत्तर, केले जबरदस्त कमबॅक