येत्या काही दिवसात भारतात इंडियन प्रीमियर लीग २०२२(indian premier league 2022) स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत युवा फलंदाज चमकदार कामगिरी करताना दिसून येतील. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांना दिग्गज खेळाडूंना मैदानावर खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. लवकरच ‘लिजेंड्स क्रिकेट लीग'(legends cricket league) स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेले क्रिकेटपटू आपला जलवा दाखवताना दिसून येणार आहेत.
पाकिस्तान संघाचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर (shoaib akhtar) आणि श्रीलंका संघाचा दिग्गज फलंदाज सनथ जयसुर्या( sanath jayasurya) पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. ज्याची घोषणा ‘लिजेंड्स क्रिकेट लीग’ने गुरुवारी (२३ डिसेंबर) केली आहे. हे दोघेही दिग्गज खेळाडू आशिया लायन्स (asia lions) संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
ही लीग स्पर्धा ३ संघांमध्ये ओमानच्या अल अमीरात स्टेडियममध्ये पार पडणार आहे. ज्यामध्ये आशिया लायन्ससह भारत आणि उर्वरित विश्व संघ असणार आहे. आशिया लायन्स संघाबद्दल बोलायचं झालं तर या संघात शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, चमिंडा वास, रोमेश कालूवितरणा आणि तिलकरत्ने दिलशान यांसारख्या दिग्गजांचा समावेश असणार आहे. यासह अजहर महमूद, उपुल थरंगा, मिसबाह-उल-हक, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, मोहम्मद युसूफ, उमर गुल, युनूस खान आणि असगर अफगाण यांचाही या संघात समावेश आहे.
भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri statement) हे लिजेंड्स क्रिकेट लीगचे आयुक्त आहेत. त्यांनी या स्पर्धेबाबत बोलताना म्हटले की, “ही उच्च दर्जाची रोमांचक क्रिकेट स्पर्धा असेल. पाकिस्तान, श्रीलंका, अफगानिस्तान आणि बांगलादेशचे दिग्गज खेळाडू मिळून एका संघात असतील. जे इतर दोन संघांना निश्चितच आव्हान देतील. आफ्रिदी, मुरली, चामिंडा, शोएब मलिक हे सगळे एका संघात खेळत आहेत. त्यामुळे नक्कीच धमाका होईल.” तर भारतीय संघातील दिग्गज खेळाडू आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड संघातील खेळाडू देखील या स्पर्धेत आपला जलवा दाखवताना दिसून येतील.”
महत्वाच्या बातम्या :
भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट संबंधांना तीन दशके पूर्ण; दोन्ही बोर्ड करतायेत खास तयारी
रवींद्र जडेजावरही चढला ‘पुष्पा’ चित्रपटाचा फिव्हर; शेअर केलेल्या व्हिडिओवर अल्लू अर्जुनची खास कमेंट
हे नक्की पाहा: